करिअरनामा ऑनलाईन । वकील होण्यासाठी इच्छुक असणाऱ्या (CLAT 2024 Registration) उमेदवारांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. कन्सोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीज (NLUs) ने अंडरग्रेजुएट (UG) आणि पदव्युत्तर (PG) अभ्यासक्रमांसाठी कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट म्हणजेच CLAT 2024 साठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. कायदा प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करु इच्छिणारे उमेदवार consortiumofnlus.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करु शकतात. इच्छुक उमेदवारांना CLAT 2024 साठी नोंदणी करण्यासाठी दि. 3 नोव्हेंबर 2023 पर्यंत अवधी देण्यात आला आहे.
असं आहे परीक्षेचं स्वरुप (CLAT 2024 Registration)
CLAT UG 2024 मध्ये मागील वर्षांप्रमाणे 150 प्रश्नांऐवजी 120 प्रश्न असतील. उमेदवारांना प्रश्न सोडवण्यासाठी दोन तासांचा कालावधी मिळेल. पाच विभागात 120 प्रश्नांची मांडणी केली जाईल. यामध्ये इंग्रजी भाषा, सामान्य जागरूकता, कायदेशीर तर्क, तार्किक तर्क आणि परिमाणात्मक तंत्रांचा समावेश आहे.
पोस्ट ग्रॅज्युएट (PG) CLAT 2024 साठी अभ्यासक्रम आणि प्रश्नांच्या संख्येत कोणताही बदल केलेला नाही. CLAT 2024 हे शैक्षणिक वर्ष 2024 मध्ये सुरु होणार्या सहभागी विद्यापीठांमधील पाच वर्षांच्या एकात्मिक LLB आणि LLM कार्यक्रमांच्या प्रवेशासाठी आहे.
असा करा CLAT परीक्षेसाठी अर्ज
1. सर्वप्रथम CLAT ची अधिकृत वेबसाईट https://consortiumofnlus.ac.in/ ला भेट द्या.
2. मुख्यपृष्ठावरील लॉगिन विंडोच्या तळाशी असलेल्या ‘Registration’ बटणावर क्लिक करा.
3. आवश्यक तपशील भरुन (CLAT 2024 Registration) नोंदणी करा आणि नंतर लॉगिन करा.
4. आवश्यक माहितीसह नोंदणी फॉर्म भरा, फोटो अपलोड करा आणि फॉर्म सबमिट करा.
5. फॉर्म सबमिट केल्यानंतर भविष्यातील संदर्भासाठी save करा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com