करिअरनामा ऑनलाईन । कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (CISCE Board Results 2024) ने आज इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन (ICSE) बोर्डाचा इयत्ता 10 वी आणि 12 वीचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेला बसलेले विद्यार्थी CISCE बोर्डाची अधिकृत वेबसाईट cisce.org वर जाऊन त्यांचे निकाल पाहू शकतात.
निकालात मुंलींची बाजी
कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशननं ICSE आणि ISC यांनी 2024 चे निकाल जाहीर केले आहेत. 2,695 शाळांपैकी 82.48 टक्के (2,223) शाळांमधील विद्यार्थी 100 टक्क्यांसह (CISCE Board Results 2024) उत्तीर्ण झाले आहेत. तर 1,366 शाळांपैकी ISC (इयत्ता बारावी) वर्ष 2024 परीक्षेसाठी 66.18 टक्के (904) शाळांमधील विद्यार्थी 100 टक्के गुणांसह उत्तीर्ण झाले आहेत. ICSE परीक्षांमध्ये मुंलींनी बाजी मारली आहे. यामध्ये 99.65 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून 99.31 टक्के मुलं उत्तीर्ण झाली आहेत. बारावीच्या परीक्षांमध्येही मुलींनीच बाजी मारली असून 98.92 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर, 97.53 टक्के मुलं उत्तीर्ण झाली आहेत.
असा पहा निकाल – (CISCE Board Results 2024)
ICSE बोर्ड निकाल 2024 अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन प्रसिद्ध केला जाईल. बोर्डाने जारी केलेल्या लिंकवरून तुम्ही निकाल तपासू शकता. यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा
1. ICSE बोर्डाच्या cisce.org वेबसाइटला भेट द्या.
2. होम पेजवरील रिजल्ट्स टॅबवर क्लिक करा.
3. यानंतर तुम्हाला ICSE निकाल वेबसाईट results.cisce.org हे पेज दिसेल.
4. इयत्ता दहावीचा निकाल पाहण्यासाठी ICSE Result 2024 Link वर क्लिक करा आणि इयत्ता बारावीचा निकाल पाहण्यासाठी, ISC Result 2024 Link वर क्लिक करा. वेगळ्या लिंक्स न मिळाल्यास कोर्स पर्यायातून ICSE किंवा ISC निवडा. (CISCE Board Results 2024)
5. CISCE लॉगिन पेज उघडेल. तुमचा युनिक आयडी, इंडेक्स नंबर आणि कॅप्चा कोड इथे टाका.
6. आता प्रिंट बटणावर क्लिक करा. तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
या वेबसाईट्सवर पाहू शकता निकाल –
1. cisce.org
2. results.cisce.org
3. results.nic.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com