करिअरनामा ऑनलाईन ।राज्य सामाईक परीक्षा सेलच्या माध्यमातून घेण्यात आलेली एमएचटी सीईटीत (MHT CET) उत्तरांच्या पर्यायामध्ये दिलेल्या तांत्रिक चुकांचे २३ गुण विद्यार्थ्यांना मिळणार आहेत.
एमएचटी सीईटीत उत्तराचे गुण ज्या विद्यार्थ्यांनी ज्या शिष्टमध्ये परीक्षा दिली आहे आणि त्या शिष्टमध्ये उत्तर देताना दिलेल्या पयार्यात तांत्रिक चूक झाली आहे अशा विद्यार्थ्यांनाच मिळणार आहेत. यासंदर्भात सीईटी सेलने हरकती आणि त्यावर घेतेलल्या निर्णयाचे परिपत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. सीईटीचा निकाल २८ नोव्हेंबरपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे.
ऑक्टोबरच्यापहिल्या आठवड्यात राज्यभरात सीईटी परीक्षा सुमारे २०० केंद्रांवर घेण्यात आली. ही परीक्षा पीसीबी गटासाठी १६ शिप्ट आणि पीसीएम गटासाठी १४ अशी ३२ शिप्टमध्ये घेण्यात आली. राज्यभरातून ५ लाख ४२ हजार ९०५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३ लाख ८३ हजार ७३६ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात परीक्षा दिली.
अधिकृत वेबसाईट – mhtcet2020.mahaonline.gov.in
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com
कोविड योद्ध्यांच्या मुलांना मेडिकलच्या ऑल इंडिया कोट्यात आरक्षण