कोविड योद्ध्यांच्या मुलांना मेडिकलच्या ऑल इंडिया कोट्यात आरक्षण

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ‘कोविड योद्ध्यांची मुले’ अशा विशेष कॅटेगरीला गुरुवारी मान्यता दिली. त्यामुळे MBBS, BDS अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी असलेल्या ऑल इंडिया कोट्यातील जागांमध्ये हे आरक्षण २०२०-२१ या वर्षाकरिता दिले जाणार आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री हर्षवर्धन यांनी या निर्णयाची घोषणा केली. यानुसार, यंदाच्या वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत ऑल इंडिया कोट्यातील पाच जागा कोविड योद्ध्यांच्या मुलांकरिता राखून ठेवण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया मेडिकल काऊन्सिल कमिटी (MCC) राबवणार आहे. या विद्यार्थ्यांना मिळालेल्या NEET 2020 परीक्षेतील ऑल इंडिया रँकवर हे प्रवेश आधारलेले असतील.

करोना संक्रमण काळात कोविड योद्ध्यांनी केलेल्या अतुलनीय कामगिरीचा गौरव म्हणून हे विशेष आरक्षण यंदा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असल्याचे हर्षवर्धन यांनी सांगितले. कोविड योद्ध्यांनी करोनाशी युद्ध लढताना आपले कर्तव्य चोख पार पाडले आणि मानवता, सहृदयतेचे दर्शन घडवले असे ते म्हणाले. ज्या कोविड योद्ध्यांनी आपलं कर्तव्य बजावताना आपला जीव गमावला किंवा कोविड-१९ बाधा होऊन ज्यांचा जीव गेला अशा कोविड वॉरियर्सच्या मुलांना MBBS AIQ जागांमध्ये आरक्षण देण्यात येण्याची शक्यता आहे.कोविड योद्धे या संज्ञेंतर्गत, सर्व प्रकारच्या खासगी, शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रुग्णालयांमधील कोविड कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. ते-ते राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश या योद्ध्यांची कॅटेगरी प्रमाणित करेल.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

एनटीएस परीक्षेसाठी अर्ज करण्यास 4 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

राज्यसेवा पूर्वपरीक्षेची तयारी करताय तर या गोष्टी लक्षात ठेवाच..

जि.प.शाळा लवकरच आदर्श शाळा म्हणून विकसित