मुंबई । राज्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता राज्यसरकारने विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर ठाम राहण्याचे ठरविले आहे. आता त्यानंतर राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या विविध विषयांच्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली तसेच पुढच्या पंधरा दिवसांनी आढावा घेऊन नवीन तारीख ठरवू असेही त्यांनी सांगितले आहे. ट्विट करून त्यांनी ही माहिती दिली आहे.
‘COVID_19 च्या पार्श्वभूमीवर राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (CET) वतीने घेण्यात येणाऱ्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या विविध विषयांच्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय. या सर्व परीक्षांच्या तारखा नव्याने जाहीर करण्यात येतील.’ असे ट्विट त्यांनी केले आहे.
#COVID_19 च्या पार्श्वभूमीवर राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (CET) वतीने घेण्यात येणाऱ्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या विविध विषयांच्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय. या सर्व परीक्षांच्या तारखा नव्याने जाहीर करण्यात येतील- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री @samant_uday pic.twitter.com/aFupTKbNhi
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 22, 2020
पालक तसेच विद्यार्थ्यांकडून सातत्याने परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी मागणी केली जात आहे. या मागणीवरूनच हा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी परीक्षा ४ जुलै ते ४ ऑगस्ट च्या काळात परीक्षा होणार असल्याचे मात्र स्पष्ट करण्यात आले होते. पण आता पुन्हा तारखांमध्ये बदल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com