करिअरनामा ऑनलाईन । राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (CET Exam 2024) कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. आता CET Cell ने पाच पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या अभ्यासक्रमांची सीईटी दि. 1 सप्टेंबर रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी दि. २३ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे.
या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार (CET Exam 2024)
सीईटी सेलकडून, फिजिओथेरपी, ॲक्युप्रेशर थेरपी, प्रोस्थेटिक ॲण्ड ऑर्थो, स्पीच ॲण्ड लॅग्वेज पॅथोलॉजी, ऑडियोलॉजी या पाच पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक सीईटी सेलचे अधिकृत संकेतस्थळ http://www.mahacet.org वर जाहीर करण्यात आले आहे. ही परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्याने महाराष्ट्रातील महाविद्यालयातून पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
23 ऑगस्ट पर्यंत करता येणार अर्ज
वर नमूद केलेल्या अभ्यासक्रमांच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना दि. २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी 11 वाजून 59 मिनिटांपर्यंत सीईटीच्या संकेतस्थळावरून अर्ज व परीक्षा शुल्क भरता येईल. अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना २८ ऑगस्ट रोजी संकेतस्थळावर प्रवेशपत्र उपलब्ध होईल.
1 सप्टेंबरला होणार परीक्षा
या पाचही अभ्यासक्रमाची परीक्षा १ सप्टेंबर रोजी (CET Exam 2024) सकाळी ११ ते दुपारी १२:३० या वेळेत होणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना सकाळी ९ ते १०:३० या वेळेत परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार आहे. १०:३० नंतर विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जाईल. पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पात्रता निकष आणि सामायिक प्रवेश परीक्षेसंदर्भातील माहिती पुस्तिका http://www.mahacet.org च्या सीईटी कक्षाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com