CET Exam 2024 : CET परीक्षा पुन्हा पुढे ढकलली; विधि पाच वर्षांच्या अभ्यासक्रमाची परीक्षा ‘या’ तारखेला

CET Exam 2024
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । CET परीक्षेबाबत एक महत्वाची (CET Exam 2024) अपडेट आहे. कायदेविषयक चाचणी परीक्षा असलेली सामाईक विद्यापीठ प्रवेश परीक्षा २०२४ (CUET) आणि विधि 5 वर्षांच्या अभ्यासक्रमाची राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (CET) एकाच दिवशी येत आहे त्यामुळे सीईटी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय सीईटी सेलने (CET CELL) घेतला आहे. आतापर्यंत विधि पाच वर्षांच्या अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा 3 वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. सध्या देशभरात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याचे सत्र सुरूच आहे.

अशा आहेत परीक्षेच्या जुन्या आणि नव्या तारखा (CET Exam 2024)
विधि पाच वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणारी सीईटी परीक्षा दोन वेळा पुढे ढकलण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या नव्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा २२ मे रोजी घेण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र कायदेविषयक चाचणी परीक्षेसाठी घेण्यात येत असलेली सामाईक विद्यापीठ प्रवेश परीक्षा २०२४ ही २२ मे रोजी होत आहे. या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी होत आहेत. त्यामुळे सीईटी सेलने विधि पाच वर्षांच्या अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या वेळापत्रकानुसार विधि पाच वर्षांच्या अभ्यासक्रमांची परीक्षा ३० मे २०२४ रोजी घेण्यात येणार आहे. सामाईक प्रवेश परीक्षेचे प्रवेश पत्रक डाऊनलोड करण्यासाठी उमेदवारांना ई-मेल आणि मोबाइलवर संदेशाद्वारे कळविण्यात येईल, असे सीईटी सेलकडून सांगण्यात आलं आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com