CET Exam 2024 : ‘सेट’ परीक्षेची अर्ज प्रक्रिया सुरु; पहा महत्वाच्या तारखा

CET Exam 2024
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी (CET Exam 2024) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्‍या सेट विभागातर्फे अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्‍यानुसार शुक्रवार (दि. 12) पासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याच्‍या प्रक्रियेला सुरवात झाली आहे. 39 व्‍या महाराष्ट्र सेट परीक्षेची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. दि. 7 एप्रिल 2024 ला महाराष्ट्रासह गोव्‍यातही ही परीक्षा घेतली जाणार आहे. लेखी स्वरुपातील म्हणजेच ऑफलाईन पद्धतीने घेतली जाणारी ही शेवटची परीक्षा असणार आहे. यानंतरच्या सेट परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने घेतल्‍या जाणार आहेत.

SET परीक्षेविषयी
1. पात्रता –
पदव्युत्तर पदवीच्या शेवटच्या वर्षाचे किंवा ती उत्तीर्ण झालेले विद्यार्थी
2. परीक्षेचे स्वरूप – परीक्षेत वस्‍तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्‍न विचारले जातील.
3. पेपर क्रमांक एक हा गणित, सामान्‍यज्ञानासह इतर विषयांवरील प्रश्‍नांवर आधारित असेल. तर पेपर क्रमांक दोन विद्यार्थ्यांनी निवडलेल्‍या विशेष विषयाचा (CET Exam 2024) असणार आहे.
4. परीक्षा फी – परीक्षेच्‍या नोंदणीसाठी खुल्‍या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आठशे रुपये तर राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना साडेसहाशे रुपये इतके शुल्‍क आहे.

काही महत्त्वाच्‍या तारखा – (CET Exam 2024)
1. परीक्षा शुल्‍कासह अर्ज भरण्याची मुदत – 12 जानेवारी ते 31  जानेवारी 2024
2. विलंब शुल्‍कासह अर्ज भरण्याची मुदत- दि. 1 ते 7 फेब्रुवारी 2024
3. ऑनलाइन अर्जात दुरुस्‍तीची मुदत-  दि. 8 ते 10 फेब्रुवारी 2024
4. प्रवेशपत्र उपलब्‍धतेची संभाव्‍य तारीख – दि. 28 मार्च 2024
5. परीक्षेचे आयोजन – दि. 7 एप्रिल 2024
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com