करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही केंद्र सरकारची नोकरी (Government Promotion ) करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची अपडेट आहे. केंद्र सरकारच्या सातवा वेतन आयोगाच्या अंतर्गत जे कर्मचारी आहेत त्यांच्याकरिता व संरक्षण मंत्रालयात जे कर्मचारी काम करत आहेत त्यांना नोकरीमध्ये प्रमोशन मिळणार आहे.
या कर्मचाऱ्यांना आता नोकरीमध्ये बढती देण्यात येणार आहे व याबाबतची अतिशय महत्त्वपूर्ण माहिती संरक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. यानुसार संरक्षण नागरिक कर्मचाऱ्यांकरिता हे प्रमोशन जाहीर करण्यात आले आहे. एवढेच नाही; तर त्यामध्ये असलेल्या सर्विस कालावधीमध्ये देखील बदल करण्यात आला आहे. या बढती करिता कर्मचाऱ्यांकरिता काही पात्रतेचे निकष ठरवण्यात आले असून जे कर्मचारी ते निकष पूर्ण करतील त्यांनाच हे प्रमोशन मिळणार आहे.
अशा आहेत अटी (Government Promotion )
कर्मचाऱ्यांच्या बढती संदर्भात मंत्रालयाच्या माध्यमातून एक महत्त्वाची सूचना जाहीर करण्यात आली आहे व यामध्ये नोकरीमध्ये बढती अर्थात प्रमोशन मिळवण्याकरिता कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या स्तरांकरिता वेगवेगळ्या कामाचा अनुभव निश्चित करण्यात आला आहे आणि यानुसारच प्रमोशन ठरवण्यात येणार आहे.
1. लेवल एक ते दोन करिता तीन वर्षाचा अनुभव आवश्यक असणार असून लेवल एक ते तीन करिता तीन वर्षाचा आणि लेव्हल दोन ते चार करिता तीन ते आठ वर्षाचा अनुभव आवश्यक असणार आहे.
2. लेवल सात पर्यंतच्या कर्मचाऱ्यांंकरिता एक ते बारा वर्षाचा अनुभव आवश्यक असणारा असून हे निकष पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच प्रमोशनचा लाभ हा मिळणार आहे.
3. तसेच प्रत्येक लेवलच्या प्रमोशन करिता असलेले निकष हे वेगवेगळे असून ग्रेडनुसार यासाठीची आवश्यक यादी तयार करण्यात आली असून ती शेअर देखील करण्यात आलेली आहे. याच यादीच्या आधारावर कर्मचाऱ्यांना प्रमोशन देण्यात येणार आहे. संबंधी माहिती देखील संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
4. यामध्ये जे कर्मचारी पात्र ठरत असतील त्यांना (Government Promotion ) त्यांच्या पात्रतेनुसार विलंब न करता ताबडतोब प्रमोशन दिले जाणार आहे. परंतु हे जे काही प्रमोशन अर्थात बढती मिळणार आहे ती नेमकी कोणत्या पदांना मिळणार आहे हे मात्र संबंधित मंत्रालयाकडून अद्याप पर्यंत स्पष्ट करण्यात आले नाही.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com