करीअरनामा । बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी ‘एमपीएससी’कडून शिफारसप्राप्त 45 उमेदवारांच्या नियुक्तीस मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली.
महिला व बाल विकास विभागामार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोगास विभागातील 45 रिक्त पदे भरण्यासाठी मागणी पाठविली होती. त्यानुसार आयोगाकडून 45 बाल विकास प्रकल्प अधिकारी (वर्ग-2) पदांसाठी शिफारशी प्राप्त झाल्या होत्या. 23 डिसेम्बर 2018 रोजी या साठी परीक्षा घेण्यात आली होती. या 45 रिक्त पदांवर शिफारसप्राप्त उमेदवारांची नियुक्ती करण्यास ॲड. श्रीमती ठाकूर यांनी मान्यता दिली.
ॲड. ठाकूर या महिला व बालविकास विभागाच्या योजनांचा व कामकाजाचा आढावा घेत आहेत. त्यादरम्यान विभागातील मनुष्यबळ, रिक्त पदे, साधनसामुग्री तसेच विभागाच्या बळकटीकरणासाठी आवश्यक बाबींची माहिती देखील त्या घेत आहेत. विभाग पूर्ण क्षमतेने कार्यरत व्हावा या दृष्टीने आगामी काळात विशेष प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
#MPSC कडून शिफारसप्राप्त ४५ बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या नियुक्तीस महिला व बालविकासमंत्री @AdvYashomatiINC यांची मान्यता. pic.twitter.com/bToAK9Nyv1
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) January 19, 2020
———————————————————-
स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी या विषयासाठी आमच्या करीअरनामाच्या परिक्षाभिमुख असलेल्या ‘दिनविशेष व Gk update’ सेक्शन ला भेट देत रहा.
———————————————————-
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 78218 00959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.
सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट www.careernama.com व Facebook page करीअरनामाला भेट द्या.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
✉ [email protected]
———————————————————-