CBSE Result 2022 : यंदाही मुलींचाच डंका!! CBSE 12 वीचा निकाल 92.71%; तृतीयपंथीयांचा निकाल 100%
करिअरनामा ऑनलाईन | प्रचंड उत्सुकता लागलेल्या CBSE परीक्षांचा इयत्ता 12 वी चा निकाल (CBSE Result 2022) अखेर जाहीर झाला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 92.71 टक्के आहे.
मुलींची पास होण्याची टक्केवारी 94.54% इतकी आहे तर मुलांची पास होण्याची टक्केवारी 91.25% इतकी आहे. त्यामुळे मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांच्या तुलनेत अधिक आहे. तसेच तृतीयपंथीयांचा निकाल 100% लागला आहे.
गेल्या वर्षीपेक्षा टक्केवारी कमी- (CBSE Result 2022)
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा CBSE बारावीचा निकाल कमी लागल्याचे चित्र आहे. 90%+ गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे. 2021 च्या तुलनेत ही मोठी घसरण आहे. बोर्डाने मात्र गेल्या वर्षी कोरोना महामारीमुळे कोणत्याही परीक्षा घेतल्या नाहीत आणि 2020 मध्येही काही परीक्षा मध्यमार्गी रद्द कराव्या लागल्या. एकूण 1,34,797 विद्यार्थ्यांना 90%+ गुण मिळाले आहेत. गेल्या तीन वर्षांतील हा नीचांक आहे. 2020 मध्ये 1.57 लाख आणि 2021 मध्ये तब्बल 1.50 लाख विद्यार्थ्यांना 90+% मिळाले होते.
असा मिळवा DigiLocker PIN-
cbse.digitallocker.gov.in वर जा
LOC क्रेडेन्शियल वापरून लॉग इन करा आणि ‘शाळा म्हणून लॉग इन करा’
पिन फाइल डाउनलोड करा वर क्लिक करा
वर्ग निवडा (CBSE Result 2022)
डाऊनलोड केल्यानंतर शाळा सुरक्षिततेच्या उद्देशाने विद्यार्थ्यांसोबत पिन वैयक्तिकरित्या शेअर करू शकतात.
निकाल पाहण्यासाठी या आहेत वेबसाईट –
cbse.nic.in
cbse.gov.in
cbseacademic.nic.in
digilocker.gov.in
results.cbse.nic.in
Central Board of Secondary Education (CBSE) announces Class 12 results pic.twitter.com/tt5h3AgEup
— ANI (@ANI) July 22, 2022
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com