करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने बोर्डाच्या १० वी आणि १२ वीच्या परीक्षा ४ मे पासून सुरू होणार आहे. याबाबत परीक्षांचे वेळापत्रक बोर्डाने मंगळवारी जाहीर केले आहे. करोना संकटाच्या महामारीनंतर यंदा प्रथमच होणाऱ्या या परीक्षा पहिल्यांदाच दोन सत्रांत आयोजित केल्या जाणार आहेत. पहिलं सत्र सकाळी १०.३० ते दुपारी १.३० पर्यंत तर दुसरं सत्र दुपारी २.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत असणार आहे CBSE Board Exams 2021
या दरम्यान इयत्ता बारावीच्या परीक्षा दोन सत्रात होणार आहेत, तर दहावीची परीक्षा ६ मे पासून सुरू होणार असून ह्या परीक्षा एकाच सत्रात होणार आहे. विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेच्या आकलनासाठी १५ मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात येणार आहे. यावेळी नियमित परीक्षेच्या दिशानिर्देशां व्यतिरिक्त सीबीएसईने कोविड-१९ मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी केल्या आहेत. यानुसार परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांना मास्क घालणे अनिवार्य असेल. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सांगितले की परीक्षा केंद्रे अशाप्रकारे अलॉट केली जातील की ज्यामुळे एका ठिकाणी गर्दी होणार नाही.CBSE Board Exams 2021
सीबीएसई बोर्डाच्या नियमानुसार परीक्षा लवकर संपवण्यासाठी सीबीएसई बारावीच्या परीक्षा ह्या दोन सत्रात आयोजित केल्या जाणार आहेत. तर दुसऱ्या सत्रामध्ये केवळ ४ पेपरची परीक्षा होणार आहे. ही परीक्षा एकूण ११४ विषयांसाठी आयोजित केली आहे. तसेच दहावीची परीक्षा ७५ विषयांसाठी आयोजित करण्यात आल्या आहेत. तसेच परीक्षा तीन तासांसाठी आयोजित केली जाईल. पण पेंटिंग, कर्नाटक संगीत आणि हिंदुस्थानी संगीत आदी विषयांसाठी दोन तासांचा वेळ १०.३० ते १२.३० असा केला आहे. विद्यार्थ्यांना व्यवस्थितपणे परीक्षा देता याव्या म्हणू्न सीबीएसई बोर्डाने दोन परीक्षांच्या मध्ये वेळ दिला आहे.
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com