CBSE 10th Exam Timetable । CBSE बोर्डाच्या दहावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । CBSE बोर्डाच्या दहावीच्या परीक्षांचं वेळापत्रक आज जाहीर झालं आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनच्या  वेबसाईट cbse.gov.in आणि cbseacademic.nic.in वर इयत्ता दहावीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. दरम्यान, 31 डिसेंबर रोजी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं, 4 मे ते 10 जून या दरम्यान परीक्षा घेण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं. परंतु सीबीएसई दहावी परीक्षेच्या वेळेसंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नव्हती. आता वेळापत्रक वेबसाईटवर जाहीर करण्यात आलं आहे. CBSE 10th Exam Timetable 

शिक्षण मंडळाने गणित, सामाजिक विज्ञान, विज्ञानसह सर्व विषयांसाठी सीबीएसईच्या 10 वीच्या नमुन्यांचे पेपर अधिकृत वेबसाईटवर जाहीर केले आहेत. सीबीएसईच्या 10 वीच्या नमुन्यांमध्ये मागील वर्षी विचारले गेलेले सर्व प्रश्न आणि प्रश्नपत्रिकेच्या पॅटर्नची कल्पना येण्यासाठी हे जाहीर केलं आहे.

2021 च्या बोर्ड परीक्षेसाठी मंडळाने दहावीचा अभ्यासक्रम 30 टक्के कमी केला आहे. कोरोनामुळे शैक्षणिक वर्ग उशीरा सुरू झाल्याने अभ्यासक्रम पूर्ण होणं शक्य नाही. तसंच ऑनलाईन वर्ग सुरू असल्याने अवघड संकल्पना समजण्यास अडचणी येऊ शकतात. विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, त्यांच्या पुढच्या शिक्षणात अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी अभ्यासक्रम वगळताना काळजी घेण्यात आली आहे.CBSE दहावीचे विद्यार्थी कमी झालेला अभ्यासक्रम तपासू शकतात आणि त्यानुसार परीक्षेची तयारी करू शकतात, जेणेकरून अतिरिक्त अभ्यास करण्यात वेळ वाया जाणार नाही. इयत्ता दहावीचा वगळण्यात आलेला अभ्यासक्रम याआधीच बोर्डाच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आला आहे.CBSE 10th Exam Timetable

 दहावी CBSE वेळापत्रक असे करा डाउनलोड – 

cbse.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा.

नवीन वेबसाईटवर क्लिक करा.

CBSE Class 10 date sheet 2021 वर क्लिक करा.

त्यानंतर CBSE च्या वेळापत्रकाची PDF डाउनलोड करा.

अधिकृत वेबसाईट – http://cbse.gov.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com