मुंबई । केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (CBSC) दहावीचा निकाल आज जाहीर होणार आहे, असे मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी निकालाबाबत माहिती दिली आहे. बारावीचा निकाल सोमवारी जाहीर झाला त्यामुळे दहावीच्या निकालाबाबत पालक आणि विध्यार्थ्यांना उत्सुकता लागली होती.
सर्वोच्च न्यायालयाने 15 जुलैपर्यंत दहावीचा निकाल जाहीर करण्याची सूचना केली होती. त्यामुळे विध्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. त्यानुसार आज केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ निकाल जाहीर करणार आहे. विद्यार्थी खाली दिलेल्या वेबसाईटवर निकाल पाहू शकतात.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे दहावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या, त्यावेळी दहावीच्या 4 विषयाच्या परीक्षा होणे बाकी होते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे या परीक्षा रद्द करून निकाल जाहीर केला जाणार आहे.
निकाल पहा – www.cbseresults.nic.in
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com