Career : आजच तुमचं profile करा Upload; नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टलवर 4.77 लाख नोकऱ्या

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. श्रम (Career) आणि रोजगार मंत्रालयाने ( Ministry of Labor and Employment ) लाँच केलेल्या नॅशनल करिअर सर्व्हिस (NCS) पोर्टलवर सध्या विक्रमी नोकऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. या विक्रमी नोंदणीमुळे अनेकांना रोजगार मिळणार आहे. यामुळे जे लोक नोकरी शोधत आहेत, त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे.

अधिक माहितीनुसार आतापर्यंत पोर्टलवर 4.77 लाख नोकऱ्यांची नोंदणी झाली होती. या पोर्टलवर आतापर्यंत उपलब्ध नोकऱ्यांची ही विक्रमी संख्या आहे. राष्ट्रीय करिअर सेवा पोर्टल 2015 मध्ये सुरू करण्यात आले होते. येथे कोणीही नोकरीसाठी नोंदणी करू शकतो शिवाय यामाध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

देशासह आणि परदेशातही नोकरीची संधी (Career)

नॅशनल करिअर सर्व्हिस (NCS) पोर्टल हे रोजगार मिळवण्यासाठी एक व्यासपीठ आहे. त्याचा उद्देश रोजगार शोधणाऱ्या पात्र व्यक्तींना संभाव्य नियोक्त्यांसोबत जोडणे हा आहे; जेणेकरून त्यांना योग्य रोजगार मिळू शकेल. तसेच याशिवाय एनसीएस करिअर समुपदेशन, व्यावसायिक समुपदेशन आणि कौशल्य विकासासाठी प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देते. पोर्टलच्या माध्यमातून देशात आणि परदेशात नोकरीच्या संधी मिळू शकतात. सरकारी आणि खासगी अशा दोन्ही क्षेत्रात उपलब्ध नोकऱ्यांची माहिती पोर्टलवर उपलब्ध केली जाते.

वाणिज्य मंत्रालयाने जारी केलेल्या माहितीनुसार, 26 सप्टेंबर 2022 पर्यंत, NCS पोर्टलवर विविध क्षेत्रातील रिक्त पदांची संख्या 4,82,264 पर्यंत वाढली आहे, जी आतापर्यंतची सर्वाधिक (Career) नोंदणी आहे. त्याच वेळी, 28 सप्टेंबर रोजी 4,77,785 नोकऱ्या उपलब्ध होत्या. याआधी, जून 2019 मध्ये सक्रिय रिक्त पदांची संख्या 3,20,917 होती, ती त्यावेळपर्यंतची सर्वाधिक नोंदणी होती. नोकरीच्या सर्वाधिक संधी ह्या वित्त आणि विमा, ऑपरेशन आणि सपोर्ट, हॉटेल फूड सर्व्हिस आणि केटरिंग, आरोग्य आणि आयटी आणि कम्युनिकेशन क्षेत्रात आहेत.

येथे मिळते संधी –

बँक, विमा
ऑपरेशन आणि सपोर्ट
आरोग्य
आयटी आणि कम्युनिकेशन्स

अशी करा नोंदणी

जे उमेदवार नोकरी शोधत असतील आणि त्यांना या पोर्टलवरुन नोकरी शोधायची असेल, त्यांना प्रथम पोर्टलवर नोंदणी करावी लागेल.

यासाठी उमेदवाराला त्याचा आयडी आणि इतर तपशील द्यावा लागेल.

याशिवाय तुम्हाला तुमची आवड असलेले क्षेत्र, कामाचा अनुभव इत्यादी इतर माहिती द्यावी लागेल.

पोर्टलचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावर केवळ कर्मचाऱ्यांची माहिती (Career) उपलब्ध नाही तर, कंपन्याही नोंदणीकृत करत असतात.

सद्यस्थितीत पोर्टलवर 2,01,478 कंपन्या किंवा नियोक्ते नोंदणीकृत आहेत.

ई-श्रम पोर्टलशी कनेक्ट 

एनसीएस पोर्टल आता एपीआयद्वारे ई-श्रमशी जोडले गेले आहे. हे असंघटित क्षेत्रातील कामगारांना NCS पोर्टलवर नोकरी शोधणारे म्हणून नोंदणी करण्यास सुलभ करते. NCS आणि Udyam पोर्टल यांच्यातील संबंधामुळे, NCS पोर्टलवर आतापर्यंत 39,000 हून अधिक MSME नोंदणीकृत झाले आहेत. NCS पोर्टलवर नोंदणीकृत ई-श्रम नोंदणीकृत व्यक्तींची एकूण संख्या 9.72 लाख आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com