करिअरनामा ऑनलाईन । जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातल्या कुसुंबे या खेडेगावातील राजू अशोक भास्कर हा शेळ्या राखणाऱ्यांचा मुलगा. (Career Success Story of PSI Raju Bhaskar) मोठे भाऊ रोजंदारीने कामाला जात. मात्र, लहान भाऊ राजू याची शिक्षणाप्रती असलेली जिद्द पाहून कुटुंबाने राजुच्या शिक्षणासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली. राजुने सुरुवातीला पोलिस हवालदाराची नोकरी सांभाळत PSI पदासाठी MPSC कडे परीक्षेचा अर्ज भरला. नोकरी करत त्याने १८ तास अभ्यास केला. परीक्षेत यश मिळवत त्याने संपूर्ण राज्यात 102 क्रमांक मिळवला… आणि हवालदाराचा PSI बनला. बिकट परिस्थितीतून मार्ग काढत राजुने मोठी मजल मारली आहे. जाणून घेऊया राजू भास्कर या तरुणाच्या जिद्दीविषयी…
दहा बाय दहाच्या पत्र्याच्या खोलीत राजुचे घर…
राजू भास्कर यांनी लहानपणापासून गरिबीचे चटके सहन केले आहेत. अद्यापही गावाकडे घरकुल योजनेतून मिळालेल्या दहा बाय दहाच्या पत्र्याच्या खोलीत ते राहतात. त्याने मोठ्या जिकिरीने अभ्यासाला सुरुवात केली. त्यांच्यातील गुणवत्ता ओळखून कुटुंबाने मजुरी व शेळीपालन करून त्यांना शिकवले. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गावातच झाले. तो तेथील शिक्षकांचे आवडते विद्यार्थी होते. उच्च माध्यमिक व महाविद्यालयात इंग्रजी विषयात तो पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने त्याने पोलिस दलात नोकरी मिळविण्यासाठी अथक परिश्रम घेतले. पोलिस हवालदार म्हणून पुणे पोलिस दलात निवड झाली व त्याने ट्रेनिंग काळात प्रथम क्रमांकसुद्धा मिळवला.
अभ्यासासाठी स्वतःला खोलीत कोंडून घेतलं… (Career Success Story of PSI Raju Bhaskar)
अधिकारी होण्याची जिद्द राजुला स्वस्थ बसू देत नव्हती. पोलिस खात्यातील नोकरी सांभाळून MPSC च्या परीक्षेसाठी त्याने कठोर परिश्रम घेतले. 2016 साली घेण्यात आलेल्या MPSC परीक्षेत अवघ्या दोन मार्कानी त्याची पोस्ट गेली. आयुष्यात पहिल्यांदा अपयश आल्यामुळे त्याला हे दुःख कायम मनात बोचत होते. पण तो थांबला नाही. 2017 साली MPSC ची जाहिरात निघाली. त्याने ठाम निश्चय करून या परीक्षेत यश मिळविले. अभ्यासासाठी स्वत:ला त्याने स्वतंत्र खोलीत कोंडून घेतले. रात्रंदिवस कष्ट घेऊन त्याने संपूर्ण राज्यात 102 रँक मिळवत घवघवीत यश मिळवले. राजू PSI झाला; हे ऐकून त्याचे आई-वडील, भाऊ-बहीण, पत्नी व नातेवाइकांना आनंदाश्रू अनावर झाले. गावातील पहिला PSI म्हणून गावाने त्याचा जाहीर सत्कार केला. चिंचवड पोलिस ठाणे व पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातर्फेही त्याचे अभिनंदन करण्यात आले.
“पेट्रोलिंगला गेलो, तरी वेळ मिळेल तसा अभ्यास करायचो”
राजू भास्कर याने मिळवलेल्या यशाबद्दल बोलताना तो म्हणतो, “साडेपाच वर्षे पोलिस हवालदार म्हणून काम केल्यानंतर आता त्याच ठिकाणी प्रशिक्षण घेऊन अधिकारी म्हणून रुजू होणे मोठे भाग्य आहे. ड्युटीवर असताना पेट्रोलिंगला गेलो, तरी वेळ मिळेल तसा अभ्यास करत होतो. हवालदार असताना खूप ओढाताण झाली. बॅंकेचा हप्ता भरण्यासाठी आणि घर खर्चासाठी पैसे गावाला पाठवावे लागत होते. त्यामुळे गरिबीची झळ बसत होती. सध्या चिंचवड पोलिस ठाण्यात सायबरमध्ये काम करत आहे. ज्या खात्यात हवालदार म्हणून काम केले त्याच खात्यात आता अधिकारी झालो आहे. माझ्या कष्टाचे चीज झाले.” (Career Success Story of PSI Raju Bhaskar)
– राजू भास्कर, पोलिस उपनिरीक्षक
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com