करिअरनामा ऑनलाईन। भारतीय आयटी कंपनी विप्रोने आपल्या 300 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले आहे. या (Career News) सर्व कर्मचाऱ्यांना मूनलाइटिंगमुळे म्हणजेच एकाच वेळी दोन ठिकाणी काम केल्यामुळे काढून टाकण्यात आले आहे. विप्रोचे अध्यक्ष ऋषद प्रेमजी यांनी बुधवारी ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनने आयोजित केलेल्या परिषदेत सांगितले की, कर्मचारी त्यांच्या दुसऱ्या किंवा आठवड्याच्या शेवटीच्या कामाबद्दल संस्थेशी स्पष्टपणे बोलू शकतात . परंतु आम्हाला 300 कर्मचारी सापडले जे थेट प्रतिस्पर्धी कंपनीसाठी काम करत होते. आमच्या कंपनीत त्यांच्यासाठी जागा नाही.
ऋषद प्रेमजी हे मूनलाइटिंग बाबतीत जोरदार टीका करतात. यापूर्वी त्यांनी स्पष्ट केले होते की, अशा कर्मचाऱ्यांना आमच्या कंपनीत जागा नाही. मूनलाइटिंग म्हणजे एका वेळी एकापेक्षा जास्त गोष्टी करणे आणि दूरस्थपणे काम करणे (घरातून काम करणे), जे कोविडच्या दिवसांमध्ये एक सर्वसामान्य बनले आहे आणि अजूनही (Career News) अनेक कामाच्या ठिकाणी ही प्रथा प्रचलित झाली आहे.
ऋषद प्रेमजी यांनी एका ट्विटमध्ये या प्रथेची तुलना फसवणुकीशी केली तेव्हा मूनलाइटिंग काम चर्चेचा विषय बनला होता. ते म्हणाले होते की आयटी इंडस्ट्रीमध्ये लोक मूनलाइटिंग करतात, याविषयी सोप्या भाषेत सांगायचे तर, ही फसवणूक आहे. नंतर इतर आयटी कंपन्यांनीही ऋषद प्रेमजीच्या मतांना समर्थन देत या विषयावर भाष्य केले.
एका रिपोर्टनुसार, आयटी कंपनी इन्फोसिसनेही आपल्या कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या संदेशात म्हटले आहे की, एकाच वेळी दोन ठिकाणी काम करण्याची परवानगी नाही. असे कोणी केल्यास त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल आणि त्याला नोकरीवरूनही काढता येईल.
आयटी कंपनी आयबीएमनेही मूनलायटिंगला अनैतिक म्हटलं आहे. कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर संदीप पटेल यांनी नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान सांगितलं की, ‘कंपनीतील कामाचे तास वगळता कर्मचारी त्यांच्या इतर वेळात त्यांना हवं ते करू शकतात, परंतु त्यामध्ये मूनलायटिंग करणं नैतिकदृष्ट्या योग्य नाही.’
तर, टेक महिंद्राचे अधिकारी सीपी गुरनानी (Career News) यांनी नुकतंच ट्विट करत मूनलायटिंगचं एकप्रकारे समर्थन केलंय. त्यांनी म्हटलंय, ‘काळानुसार बदलत राहणं महत्त्वाचं आहे, आणि मी आमच्या कामाच्या पद्धतीतील बदलाचं स्वागत करतो.’
गेल्या काही दिवसांत नवीन प्रथा म्हणून मूनलायटिंगचं प्रमाण वाढत आहे. पण यामुळे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची चिंता वाढली असून, हे प्रकार रोखण्याचं त्यांच्यासमोर आव्हान आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com