करिअरनामा ऑनलाईन । खासगी विनाअनुदानित शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांतून (Career News) अनुदानित शाळा-कनिष्ठ महाविद्यालय किंवा तुकडीवर बदली करण्यासंदर्भातील महाविकास आघाडी सरकारच्या काळातील शासन निर्णयास स्थगिती देण्याच्या विद्यमान शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयामुळे शिक्षक संघटनांची झोप उडाली आहे. या निर्णयाला राज्यभरातून शिक्षक संघटनांनी मोठा विरोध दर्शविला असून, नाशिकमध्येही मंगळवारी शिंदे-फडणवीस सरकारने ही स्थगिती उठवावी, या मागणीचे निवेदन राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. भाऊसाहेब चव्हाण यांना दिले. मागणी मान्य न झाल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशाराही महासंघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय शिंदे यांनी सरकारला दिला.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात जून २०२० मधील अधिसूचना आणि एप्रिल २०२१ मधील शासन निर्णयानुसार राज्यातील विना अनुदानित शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांत सेवेत (Career News) असणाऱ्या शिक्षकांना अनुदानित शाळा-कनिष्ठ महाविद्यालय, तुकडीवर बदली देण्यास मंजुरी देण्यात आली होती. परंतु, या निर्णयास विद्यमान सरकारने १ डिसेंबर रोजीच्या शासन परिपत्रकानुसार स्थागिती दिली आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील शाळा-कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत शिक्षकांमध्ये असंतोषाचा भडका उडाला आहे.
हा निर्णय नियमानुसार सेवेत आलेल्या शिक्षकांवर अन्याय करणारा असून, नियमांच्या पालनाबाबत अनियमितता झाली असेल तेथे चौकशी करून कारवाई करण्यास हरकत नाही. परंतु, सरसकट सर्वच विनाअनुदानित वरून अनुदानित वर झालेल्या बदल्यांबाबत संशय व्यक्त करणे अनुचित (Career News) असल्याची भूमिका महासंघाने घेतली आहे. हा अन्यायकारक निर्णय रद्द करा अन्यथा आंदोलन उभारू असा इशारा महासंघाच्या व्ही. एस. सोनवणे, ए. डी. भालेराव, बी. ई. गोळे, यू. बी. हाडोळे यांनी दिला आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com