Career News : खबरदार!! ऑफिसमधील सहकारी सुट्टीवर असताना फोन केला तर भरा 1 लाखाचा दंड; कंपनीचा अजब फतवा 

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सुट्टीवर जाताना तुम्ही ऑफिसचं काम काही (Career News) प्रमाणात शिल्लक राहते. तुमच्या सुट्टीच्या काळात ऑफिसमधून तुम्हाला कुणीही त्रास देणार नाही, अशी आशा बाळगता. मात्र, भारतात अजूनही अशी अनेक कार्यालये आहेत, जिथे सुट्टीच्या काळातही त्यांच्यावर कामाचं ओझं असतं. अशा परिस्थितीत मुंबई येथील एका कंपनीने एक धक्कादायक निर्णय घेतला, ज्यामुळे ऑफिसमधील कर्मचाऱ्याचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. एका भारतीय टेक स्टार्टअप कंपनीने सुट्टीच्या काळात सहकाऱ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दंड आकारून या समस्येचं निराकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

कंपनीने यावर एक उपाय काढला आहे. त्यांनी त्यांचे कर्मचारी दरवर्षी एक आठवडा कामापासून दूर राहतील आणि सिस्टमशी अनप्लग असतील असं ठरवलं आहे. या दरम्यान (Career News) त्यांना कुणी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर त्यांना एक लाख रुपये दंड भरावा लागेल. ड्रीम11 फँटसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म चालवणारी मुंबईस्थित कंपनी ड्रीम स्पोर्ट्सने एका मीडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, दरवर्षी आपल्या कर्मचाऱ्यांनी एक आठवड्याची सुट्टी घेणे आवश्यक आहे.

कंपनीचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हर्ष जैन या बाबत म्हणतात, “जर एखाद्या सहकाऱ्याने सुट्टीच्या काळात त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर त्यांना 1,00,000 रुपये दंड ठोठावण्यात येईल. “वर्षातून एकदा तुम्हाला आठवडाभरासाठी (Career News) सिस्टिममधून बाहेर काढलं जाईल  ते पुढे म्हणाले की, यामुळे सुट्टीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना एका आठवड्याचा चांगला ब्रेक मिळतो. तसेच अनप्लग झालेल्या काळात कोणालाही कामाचे ओझे नको असते. त्यामुळे त्या कर्मचाऱ्याला सुट्टीचा आनंद घेता येईल आणि एकमेकांच्या सुट्टीचा आदर करण्याची शिकवण या माध्यमातून रुजवली जाईल.”

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com