करिअरनामा ऑनलाईन। जगभरातील सर्वात मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक (Career News) असलेल्या फेसबूकच्या तब्बल 12,000 कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर संकट आले आहे. अहवालानुसार, फेसबूकची पॅरेंट कंपनी मेटा सोशल आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी तब्बल 15 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याच्या तयारीत आहे. काही दिवसांपूर्वी स्नॅपचॅट, रॉबिनहूड, मायक्रोसॉफ्टसोबतच इतर कंपन्यांनी सुद्धा आपल्या कर्मचाऱ्यांची कपात केली होती.
का होतेय नोकर कपात?
आंतरराष्ट्रीय स्तरावर बदलेली परिस्थिती, एकूण उत्पन्न, आणि उद्दीष्ट गाठण्यात न आल्याने कंपन्यांकडून कर्मचारी कपात सुरू असल्याचं बोललं जात आहे. मेटा (Meta) कथितपणे फेसबूक (Facebook) कर्मचारी कपात करु शकते. इनसायडरच्या एका रिपोर्टनुसार, वरिष्ठ अधिकारी हे कंपनीतील जे कर्मचारी चांगले प्रदर्शन करत नाहीत अशा व्यक्तींना कामावारुन काढू शकतात. पुढील काही (Career News) आठवड्यांत 15 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केलं जाऊ शकतं. म्हणजेच जवळपास 12,000 कर्मचाऱ्यांची नोकरी जाण्याची शक्यता आहे.
एका कर्मचाऱ्याने इनसायडरला सांगितले की, “असे वाटते की ते पुढे जात आहेत मात्र सत्य परिस्थिती अशी आहे की, त्यांना जबरदस्तीने काढले जात आहे”. फेसबूक ही सोशल नेटवर्किंगमधील दिग्गज कंपनी आहे. मात्र, या कंपनीत गेल्या अनेक महिन्यांपासून भरतीवर बंदी घालण्यात आली आहे.
मेटा शेअर्समध्ये घसरण (Career News)
या वृत्तानंतर मेटाच्या शेअर्सची किंमत जवळपास 380 डॉलर्सच्या घरात पोहोचली आहे. गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअरच्या किमतीत 60 टक्क्यांनी घसरण झाली आहे. मेटाचे संस्थापक (Career News) आणि सीईओ मार्क जुकरबर्ग यांनी स्पष्ट केलं आहे की, सर्व विभागातील भरती प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. तसेच लवकरच कर्मचारी कपात करण्याचाही इशारा देण्यात आला आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com