Career News : सावधान!! परदेशातून नोकरीचा कॉल आलाय? मग होऊ शकते मोठी फसवणूक; बघा काय आहे प्रकरण

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। सोशल मीडियामुळे संपर्क साधणं सोपं झालं; मात्र यामुळे फसवणुकीच्या (Career News) घटनांमध्येही वाढ होते आहे. तरुणांना नोकरीचं आमिष दाखवून फसवणाऱ्या रॅकेटची सध्या सगळीकडे चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आयटी कंपन्यांमधल्या फसवणुकीला तरुणांनी बळी पडू नये, यासाठी सरकारने मार्गदर्शक तत्त्वं जाहीर केली आहेत. काही दिवसांपूर्वी बनावट आयटी कंपनीनं 100 हून अधिक तरुणांना नोकरीचं आमिष दाखवून म्यानमारमध्ये नेल्याची घटना उघड झाली होती. त्यापैकी 32 भारतीय नागरिकांची सरकारनं सुखरूप सुटका केली आहे. त्यामुळे अशा बनावट नोकऱ्यांच्या जाळ्यात तरुणांनी अडकू नये, यासाठी सरकारनं आवाहन केलं आहे.

नोकरीचं आमिष दाखवून केलं जातं आकर्षित

थायलंडमधल्या कंपन्यांमध्ये डिजिटल सेल्स अँड मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह या पदांसाठी भारतीय तरुणांना आकर्षक नोकरीचं आमिष दाखवलं जात असल्याबाबत थायलंड आणि (Career News) म्यानमारमधल्या भारतीय दूतावासाला समजलं होतं. परराष्ट्र मंत्रालयानं त्याबाबत माहिती दिली आहे. हे बनावट नोकऱ्यांचं रॅकेट असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कॉल सेंटरमधले घोटाळे व क्रिप्टोकरन्सी गैरव्यवहारामधल्या कथित आयटी कंपन्यांकडून हे रॅकेट चालवलं जात आहे. दर वर्षी लाखो तरुण परदेशात नोकरीस जाण्यासाठी इच्छुक असतात. अशा तरुणांना या संघटना हेरतात व जाळ्यात अडकवतात.

आधी करा खात्री (Career News)

परराष्ट्र मंत्रालयानं या रॅकेटविषयी माहिती दिली आहे. तरुणांनी अशा बनावट नोकरीच्या रॅकेटमध्ये अडकू नये, यासाठी खात्री करूनच पुढे जावं असं त्यांनी म्हटलं आहे. गैरव्यवहार करणाऱ्या काही कंपन्या या रॅकेटमध्ये समाविष्ट असून आयटीसाठीची कौशल्यं असणाऱ्या तरुणांना ते जाळ्यात ओढतात, असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. सोशल मीडियावरच्या जाहिराती व दुबई आणि भारतातल्या एजंट्सकडून आकर्षक नोकरीच्या पॅकेजचं आमिष दाखवून तरुणांना फसवलं जातं.

अशी होते फसवणूक

अशा 100 तरुणांना बनावट कंपन्यांकडून म्यानमारमध्ये नेण्यात आलं आहे. त्यापैकी 32 नागरिकांची अधिकाऱ्यांनी सुटका केली आहे. या तरुणांना आयटी कंपनीत नोकरी देण्याच्या (Career News) बहाण्यानं म्यानमारमधल्या दुर्गम प्रदेशात नेण्यात आलं होतं. आणखी 60 जणांची सुटका करण्यासाठी थायलंड आणि म्यानमार या देशांसोबत भारताची चर्चेतून कार्यवाही सुरू आहे. या नागिरकांना अवैध मार्गानं सीमापार नेण्यात आलं. अनेकांना म्यानमारमध्ये नेण्यात आलं. वाईट परिस्थितीत काम करण्यासाठी त्यांना कोंडून ठेवण्यात आलं.

परराष्ट्र मंत्रालयाचा सल्ला

अशा पद्धतीनं बनावट नोकरीच्या रॅकेटपासून भारतीय तरुणांनी सावध राहण्याचा इशारा परराष्ट्र मंत्रालयानं दिला आहे. नोकरीसाठी टुरिस्ट किंवा व्हिजिट व्हिसावर परदेशात जाण्यापूर्वी उमेदवारांनी भारतीय दूतावासाकडे संबंधित कंपनीची चौकशी करावी, असा सल्लाही परराष्ट्र मंत्रालयानं दिला आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com