करिअरनामा ऑनलाईन । प्रत्येकाला अशी नोकरी मिळवायची (Career News) असते ज्यामध्ये मोठा पगार आणि सुरक्षा दोन्ही असते. काही लोकांसाठी पैशाला नेहमीच प्राधान्य असते. जर तुम्ही देखील अशा उमेदवारांच्या यादीत आलात ज्यांना त्यांच्या नोकरीच्या सुरुवातीपासूनच चांगला पगार मिळवायचा असेल तर तुम्ही या नोकऱ्या पाहू शकता. हे काही नोकरीचे पर्याय आहेत जिथे तुम्ही अगदी सुरुवातीपासूनच महिन्याला 1 लाख रुपये कमवू शकता आणि इतर सुविधांचाही लाभ घेऊ शकता.
1. इंडियन ऑडिट एंड एकाउंट सर्विस (Indian Audit and Account Service)
जर तुम्हाला अकाऊंट विषयात आवड असेल तर तुम्ही या क्षेत्रात प्रवेश करू शकता. येथे सुरुवातीचा पगार 56 हजार रुपये ते 2.5 लाख रुपये दरमहा आहे. याशिवाय इतरही अनेक सुविधा येथे उपलब्ध आहेत. तुमच्या कामातील प्रगती आणि अनुभवानूसार पगारात वाढ होते.
2. नागरी सेवा (Civil Services)
सिव्हिल सर्व्हिसेस ही भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते, परंतु एकदा तुम्ही ती पास केली आणि चांगली रँक मिळवली की तुम्हाला चांगली नोकरी मिळते. IAS, IPS, IFS आणि IRS सारखी पोस्ट ही त्याची काही उदाहरणे आहेत. चांगला पगार, घर, गाडी अशा (Career News) अनेक सरकारी सुविधा यामध्ये मिळतात. इथे सुरुवातीला 56 हजारांपासून पगार सुरू होतो आणि लवकरच तो महिन्याला 1 लाख रुपयांपर्यंत पोहोचतो.
3. संरक्षण सेवा (Defence Services)
देशाच्या संरक्षण क्षेत्रातील नोकऱ्यांमध्येही चांगला पैसा उपलब्ध आहे. ज्यावेळी तुमची निवड होते त्यावेळी अनेकवेळा पगार एक लाख नसला तरी काही दिवसात रँक वाढल्याने पगारामध्ये वाढ होते. या नोकरीची खास गोष्ट म्हणजे इथे चांगल्या पगाराबरोबरच इतरही अनेक सुविधा मिळतात.
4. सार्वजनिक क्षेत्रातील बँक (Public Sector Bank)
जर तुम्हाला जास्त पगाराची सरकारी नोकरी हवी असेल तर सार्वजनिक क्षेत्रातील बँका हा एक चांगला पर्याय आहे. येथे, एंट्री लेव्हलवरच, मासिक पगार 50 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत आहे. बाकी, हे तुमच्या पदावर आणि तुम्ही ज्या बँकेत काम करता त्यावरही अवलंबून आहे. यासोबतच या कर्मचाऱ्यांना पेन्शन, वैद्यकीय विमा, घरांची सुविधा अशा सुविधाही मिळतात.
5. इथेही आहे तगडा पगार
याशिवाय लाखात पगार असलेल्या काही नोकऱ्या (Career News) खालीलप्रमाणे आहेत. सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त, आरबीआय ग्रेड बी अधिकारी, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, सरकारी विद्यापीठातील प्राध्यापक.
या नोकऱ्या मिळवण्यासाठी तुमची शैक्षणिक कामगिरी चांगली असणे आवश्यक आहे. विविध स्तरांवर प्रत्येकासाठी प्रवेश परीक्षा आहेत, त्यात उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची निवड अंतिम असते. या भरती वेगवेगळ्यावेळी येतात आणि प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला नोकरी मिळते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com