Career : Infosys च्या कर्मचाऱ्यांना आता एकाच वेळी करता येतील दोन जॉब; मूनलायटिंगला मिळाली मंजुरी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या महागाईमुळे घरखर्च (Career) चालवणं कठीण आहे. यासाठीच अनेकजण आपल्या मुख्य जॉबसोबत सेकंड इन्कमचाही विचार करताना दिसतात. एकाच वेळेस दोन ठिकाणी जॉब करण्यालाच ‘मूनलायटिंग’ असं म्हणतात. ऑफिसमधलं काम संपलं, की संध्याकाळी पार्टटाइम काम करणारे अनेक जण आहेत. तुटपुंजा पगार हे यामागचं मुख्य कारण; पण अशाप्रकारे एकाचवेळी दोन जॉब करणं बेकायदा आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीवर कंपनी केस करू शकते; पण एखादी कंपनी आपणहून तुम्हाला दोन ठिकाणी काम करण्याची मुभा देत असेल तर? ही बातमी खरी आहे. भारतातल्या एका नामांकित आयटी कंपनीने अशा प्रकारची सवलत कर्मचर्‍यांना देऊ केलीय.

मूनलायटिंगला परवानगी

इन्फोसिस ही भारतातली आयटी क्षेत्रातली (Career) नामांकित कंपनी आहे. या कंपनीने आता एकाच वेळी दोन जॉब करण्याची मुभा कर्मचार्‍यांना दिलीय. अर्थात, यासाठी कर्मचार्‍यांना काही नियमही पाळावे लागतील. दुसरा जॉब करण्यासाठी सर्वप्रथम त्या कर्मचाऱ्यांना मॅनेजरची परवानगी घेणं आवश्यक आहे. याशिवाय आणखी दोन अटी कंपनीने घातल्यात. एक म्हणजे कर्मचारी केवळ गिग जॉब्ज करू शकतील. दुसरी अट अशी की कर्मचारी जे काम करतील, त्याचा इन्फोसिसच्या क्लायंटशी कुठलाही संबंध असणार नाही. दोन्ही कंपन्या भिन्न क्षेत्रातल्या असाव्यात. एकमेकांशी कुठलेच स्पर्धात्मक संबंध असता कामा नये.

गिग जॉब म्हणजे काय? (Career)

कंपनीच्या एका अंतर्गत कार्यक्रमात कर्मचर्‍यांना याबद्दल माहिती दिल्याचं समजतंय. त्यानुसार कर्मचारी गिग जॉब्ज करू शकतील. गिग जॉब्ज म्हणजे काय, हे जाणन घेऊया. गिग जॉब म्हणजे कोणताही असा जॉब जो फावल्यावेळात केला जातो. अशा ठिकाणी कामाचे तास मर्यादित स्वरूपाचे असतात. उदाहरणार्थ, तुम्ही ऑफिसचे कामाचे तास सोडून शेअर टॅक्सी चालवत असाल, स्वत:चा इंटीरियर डिझायनिंगचा व्यवसाय करत असाल, कोचिंग क्लास चालवत असाल, फिटनेस ट्रेनर म्हणून काम करत असाल, तर त्या बाबी गिग जॉब या प्रकारात मोडतात. पूर्वी, खरं तर गिग जॉब्ज हे नामाभिधान किंवा टर्म केवळ म्युझिशियन्स करता वापरली जायची. कारण त्यांचा परफॉर्मन्स केवळ काही वेळासाठीचा असायचा.

कसा होणार इन्फोसिस कंपनीला फायदा?

अशा प्रकारची सवलत कर्मचार्‍यांना देऊन इन्फोसिस कंपनीला काय फायदा होणार, याबाबत जाणून घेऊया. तज्ज्ञांच्या मते, कंपनीने उचलेलं हे पाऊल कंपनीसाठी लाभदायीच ठरेल. कारण यामुळे कर्मचार्‍यांना सेकंड इन्कम उपलब्ध होणार आहे. अर्थात, यामुळे कर्मचार्‍यांना त्यांचा सद्यस्थितीतला (Career) जॉब सांभाळता येईल. आपली टेक्निकल बाबींची आवडही जपता येईल. त्यामुळे कंपनीला इतर आव्हानात्मक आघाड्यांवर काम करता येईल.

परंतु, गिग जॉबच्या प्रकाराला मूनलायटिंगचा दर्जा दिलेला आहे का याबद्दल कंपनीने अजून सांगितलेलं नाही. जगभरात मूनलायटिंग हा प्रकार जोर धरू लागलाय. मूनलायटिंगमुळेच इन्फोसिससहित इतरही अनेक आय टी कंपन्यांनी कर्मचार्‍यांना कमी केलं होतं. इन्फोसिसने आपल्या दुसर्‍या (Career) तिमाही धोरणात आपण मूनलायटिंगचं समर्थन करत नसल्याचं म्हटलं होतं. यासाठीच मागच्या वर्षभरात त्यांनी अनेक कर्मचार्‍यांना कमी केलं होतं.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com