करिअरनामा ऑनलाईन । जेव्हा सरकारी नोकरीचा विचार मनात येतो (Career After 10th and 12th) तेव्हा एकाच गोष्टीचा विचार चालू असतो; की त्यासाठी कोणती परीक्षा द्यावी लागेल. त्यासाठी कशी पूर्वतयारी करावी लागेल. प्रश्न कुठून येतील आणि प्रश्न कसे येतील हे माहीत नाही. तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही सरकारी नोकऱ्यांबद्दल सांगणार आहोत ज्या तुम्ही सहज मिळवू शकता. आम्ही भारतातील अशा नोकऱ्यांबद्दल बोलत आहोत ज्या तुम्हाला सहज मिळू शकतात आणि यामुळे तुमचे भविष्य उज्ज्वल होऊ शकते.
SSC CHSL परीक्षा
या अंतर्गत विविध विभागांमध्ये भरतीसाठी परीक्षा घेतल्या जातात. यामध्ये निम्न विभागीय लिपिक, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, पोस्टल सहाय्यक, वर्गीकरण सहाय्यक आणि डेटा एंट्री ऑपरेटरची भरती केली जाते. या अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवाराने 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
रेलवे ग्रुप डी (Level 1) भरती
भारतीय रेल्वेची नोकरी सुरक्षित मानली जाते आणि लाखो उमेदवार येथे भरती होण्यासाठी अर्ज करतात. रेल्वेत भरतीही चांगल्या संख्येने होते. लेव्हल 1 अंतर्गत गँगमन, ट्रॅकमन, कॅबमन, हेल्पर इत्यादींची भरती केली जाते. विशेष म्हणजे यासाठी पात्रता 10 वी उत्तीर्ण आहे.
SSC MTS अंतर्गत भरती (Career After 10th and 12th)
MTS म्हणजे मल्टी टास्किंग स्टाफच्या भरतीसाठी परीक्षा घेतली जाते. याअंतर्गत अतांत्रिक कर्मचाऱ्यांची भरती केली जाते. ही परीक्षा स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) द्वारे घेतली जाते. या अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवार 10 वी पास असणे आवश्यक आहे.
बँक लिपिक भरती
IBPS इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल बँकेत लिपिकांच्या भरतीसाठी परीक्षा घेते. यासाठी लेखी परीक्षा सोपी मानली जाते, कारण या परीक्षेत सोपे प्रश्न विचारले जातात. या (Career After 10th and 12th) अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे.
आपण ज्या नोकऱ्यांबद्दल बोलत आहोत त्या फक्त ज्यांची पात्रता 10वी, 12वी किंवा पदवीधर आहे अशा आहेत. या अंतर्गत RRC ग्रुप D, SSC MTS, SSC CHSL आणि IBPS लिपिक इत्यादींचा समावेश आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com