करिअरनामा ऑनलाईन । श्री. टी. व्ही. सोमनाथन यांची पुढील (Cabinet Secretary) दोन वर्षांसाठी कॅबिनेट सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आज आम्ही तुम्हाला कॅबिनेट सचिव कोण असतात आणि त्यांच्या जबाबदाऱ्या काय असतात याविषयी सांगणार आहोत.
वरिष्ठ आयएएस अधिकारी टीव्ही सोमनाथन यांची शनिवारी राजीव गौबा यांच्या जागी कॅबिनेट सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. श्री सोमनाथन, तामिळनाडू केडरचे 1987 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. सध्या ते केंद्रीय वित्त सचिव आणि खर्च सचिव म्हणून काम करत आहेत.
मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने श्री टीव्ही सोमनाथन (Cabinet Secretary) यांची 30 ऑगस्ट 2024 पासून दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी कॅबिनेट सचिव म्हणून नियुक्तीला मान्यता दिली आहे. तथापि, कॅबिनेट सचिव कोण असतात आणि त्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? जर माहीत नसेल तर आज आम्ही तुम्हाला या पदाबद्दल आणि या पदावर असलेल्या व्यक्तीच्या जबाबदाऱ्यांबद्दल सांगणार आहोत. अधिक माहिती घेण्यासाठी पुढे वाचा…
कॅबिनेट सचिव पद काय आहे? (Cabinet Secretary)
कॅबिनेट सचिव हे भारत सरकारच्या प्रशासकीय संरचनेतील सर्वोच्च पद आहे. हे पद एका वरिष्ठ IAS अधिकाऱ्यासाठी राखीव आहे आणि सामान्यतः देशातील सर्वात वरिष्ठ नागरी सेवक म्हणून हे पद ओळखले जाते. कॅबिनेट सचिवांचे कार्यालय पंतप्रधान कार्यालय (Prime Minister Office) अंतर्गत येते आणि या पदावर काम करणारी व्यक्ती पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाचे प्रमुख सल्लागार असतात. ते सरकारच्या प्रशासकीय कामकाजात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात.
कॅबिनेट सचिवांच्या जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे –
1. पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाचे मुख्य सल्लागार – कॅबिनेट सचिव पंतप्रधान आणि इतर कॅबिनेट मंत्र्यांना प्रशासकीय बाबींवर सल्ला देतात.
2. मंत्रालये आणि विभागांचे निरीक्षण – कॅबिनेट सचिव विविध मंत्रालये आणि विभागांच्या क्रियाकलापांवर लक्ष ठेवतात आणि सरकारची धोरणे योग्यरित्या अंमलात आणली जात आहेत की नाही याची खात्री करतात.
3. आपत्ती व्यवस्थापन – राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून, कॅबिनेट सचिव आपत्तींबाबत सरकारच्या प्रतिसादात समन्वय साधतात. (Cabinet Secretary)
4. सरकारी धोरणांचा समन्वय – कॅबिनेट सचिव विविध मंत्रालये आणि विभागांमधील धोरणांचा समन्वय साधतात, जेणेकरून सरकारच्या कामकाजात एकसमानता राखली जाते.
5. कॅबिनेट बैठका आयोजित करणे – कॅबिनेट सचिव कॅबिनेट बैठकांचे आयोजन आणि नियोजन करतात. सर्व अजेंडांवर चर्चा होऊन महत्त्वाचे निर्णय घेतले जातील (Cabinet Secretary) याचीही ते खात्री देतात.
6. इतर प्रशासकीय कार्ये – कॅबिनेट सचिव हे सरकारच्या इतर प्रशासकीय कार्यांचे आणि विविध उच्च-स्तरीय समित्यांच्या कार्यांचे प्रमुख देखील असतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com