करिअरनामा ऑनलाईन | CA परिक्षेकरीता इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय ICAI या संस्थेने घेतला आहे. करोणाच्या पार्श्वभूमीवर सीए परीक्षेसाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा अर्ज करण्याची संधी पुन्हा एकदा मिळणार आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडिया (ICAI) यांनी CA परिक्षेकरीता अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.
आता अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 6 मे असणार आहे.
करोणा पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाऊन आणि अन्य अडचणीमुळे काही विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अर्ज करता आला नाही. त्यांच्यासाठी आईसीएआयने ही सुविधा परत सुरु केली आहे. 4 मे पासून 6 मे रात्री 11 वाजून 59 मिनिटापर्यंत विद्यार्थी अर्ज करू शकणार आहेत. या महिन्यातच(मे 2021) CA ची परीक्षा घेतली जाणार होती. परंतु देशभरामध्ये वेगवेगळ्या भागात असलेल्या लॉकडाऊनमुळे ही परीक्षा स्थगित करण्यात आली होती.
अर्ज न करता आल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाकडे विनंती अर्ज केले होते. यामध्ये करोणा पार्श्वभूमीवरील टाळेबंदिमुळे अर्ज न करता आल्याने त्यांना पुन्हा एकदा अर्ज करण्याची संधी हवी होती. त्यानुसार चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाने अशा विद्यार्थ्यांसाठी अर्ज प्रणाली पुन्हा एकदा सुरू केली आहे.