CA परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी ; असे करा डाउनलोड

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन ।द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने नोव्हेंबर परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड जारी केले आहे. आयसीएआयच्या अधिकृत वेबसाईटवर अॅडमिट कार्ड जारी करण्यात आले आहे. आयसीएआयच्या अधिकृत वेबसाईट icaiexam.icai.org

आयसीएआयच्या वेबसाईटवर अॅडमिट कार्डसंबंधीचे परिपत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे.  ‘सीए फाउंडेशन, इंटरमिडिएट (IPC), इंटरमिडिएट, फायनल आणि नव्या अभ्यासक्रमासह फायनल परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड जारी करण्यात आले आहेत. उमेदवारांचे छायाचित्र आणि स्वाक्षरी या अॅडमिट कार्डवर असेल. उमेदवारांना प्रत्यक्ष कोणत्याही प्रकारचे अॅडमिट कार्ड दिले जाणार नाही. उमेदवारांनी ऑनलाइन अॅडमिट कार्ड डाऊनलोड करून त्याची प्रिंट घेऊन ठेवावी.’ हे अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्याची थेट लिंक या वृत्तासोबत देत आहोत.

असे करा सीए परीक्षेचे अॅडमिट कार्ड डाउनलोड  – 

आयसीएआयच्या icaiexam.icai.org या अधिकृत संकेतस्थळावर जा.

लॉग इन किंवा रजिस्टर कराल. https://icaiexam.icai.org/

तुमचा आयडी आणि पासवर्ड एन्टर करा.

अॅडमिट कार्ड डाऊनलोड करा.

आता तुमचं अॅडमिट कार्ड स्क्रीनवर दिसेल.

अॅडमिट कार्ड डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंटआऊट काढून ठेवा.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा –https://careernama.com