करिअरनामा ऑनलाईन। गृहविभागाची महत्त्वपूर्ण बैठक आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत पार (Breaking News) पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली तसेच काही निर्णय देखील घेण्यात आले आहेत. यामध्ये पोलीस भरतीबाबतची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. पोलिसांच्या 20 हजार पदांसाठी ही भरती घेतली जाणार आहेत आहे. त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे.
LIVE | Media interaction in #Mumbai https://t.co/U2J2qC4PY9
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 26, 2022
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यसोबत चर्चा करुन दोन वर्षांतील पोलीस भरती लवकरच घेतली जाणार आहे. एकूण 20 हजार पदांसाठी ही भरती घेतली जाणार आहे. आठ हजार पदांसाठी आधीच (Breaking News) जाहिरात निघाली आहे. आता लवकरच 12 हजार पदांसाठी जाहिरात काढली जाणार आहे. पोलीस दलास यामुळे निश्चित फायदा होईल अशी आशा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
यावेळी फडणवीसांनी वेदांत- फॉक्सकॉनच्या प्रकल्पावरून महाविकास आघाडीवर टीका केली. महाविकास आघाडी सरकारने प्रकल्पासाठी कंपनीला जागाच दाखवली नव्हती. तसेच एकही कॅबिनेटची बैठक देखील घेण्यात आली नव्हती. महाविकास आघाडीच्या काळात वेदांत प्रकल्पाबाबत काहीच झालं नाही, असा आरोप फडणवीसांनी केलाय.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com