Bonus : बॉस असावा तर असा!! बोनसचा आकडा ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । एका महिला बॉसने आपल्या कर्मचाऱ्यांना (Bonus) लाखो रुपयांचा बोनस देऊन आश्चर्याचा धक्का दिला आहे. ख्रिसमसनिमित्त या महिलेने आपल्या 10 कर्मचाऱ्यांना 1 लाख डॉलर म्हणजेच भारतीय चलनात 80 लाख रुपयांपेक्षा जास्त बोनस देण्याची घोषणा केली आहे. या महिला बॉसने बैठकीत अचानकच बोनस जाहीर करून त्यांना आश्चर्याचा धक्का दिला. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून या उदार बॉसची जगभरात चर्चा सुरू आहे. आता लोकांनाही असाच बॉस हवाय.

ऑस्ट्रेलियाच्या ‘रॉय हिल’ कंपनीची बॉस जीना राइनहार्ट ही ती व्यक्ती आहे जिने 10 कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 82 लाख रुपयांचा बोनस जाहीर केला आहे. हा ‘ख्रिसमस बोनस’ असल्याचं म्हटलं जातंय.

न्यूज कॉर्प ऑस्ट्रेलियानं दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या आठवड्यात राइनहार्टने रॉय हिलच्या सर्व कर्मचाऱ्यांना एका महत्त्वाच्या घोषणेसाठी तयार राहण्यास सांगितलं होतं.

यानंतर तिने एक बैठक बोलावून कर्मचाऱ्यांना सांगितलं की ती 10 जणांची नावं घेणार आहे. त्यांना ‘ख्रिसमस बोनस’ म्हणून 1 लाख डॉलर देण्यात (Bonus) येणार आहेत. हे ऐकून कर्मचारी स्तब्ध झाले.

रिपोर्टनुसार, बोनस मिळालेल्या कर्मचाऱ्यांपैकी एक कर्मचारी तीन महिन्यांपूर्वी कंपनीत रुजू झाला होता.

फोर्ब्सच्या मते, लोहखनिजामुळे राइनहार्टचे नशीब पालटलं आहे  ती लोहखनिज शोधक लँग हँकॉक यांची मुलगी आहे. राइनहार्टने दिवंगत वडिलांच्या कंपनीची पुनर्बांधणी केली. आर्थिकदृष्ट्या ही कंपनी अडचणीत सापडली होती.

खाणकाम आणि कृषी कंपनी हैनकॉक (Bonus) प्रॉस्पेक्टिंग (Hancock Prospecting) नावाची ही कंपनी आहे.

राइनहार्ट ही ऑस्ट्रेलियाची सर्वात श्रीमंत व्यक्ती असून त्यांची संपत्ती 34 अब्ज ऑस्ट्रेलियन डॉलर इतकी आहे. त्यांच्या कंपनीला गेल्या 12 महिन्यात 190 अब्ज रुपयांपेक्षा जास्त नफा झाला आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com