करिअरनामा ऑनलाईन । विवाहित मुलीला अनुकंपा आधारित (Bombay High Court) नोकरी नाकारणे असंवैधानिक आहे, असा महत्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. मुलीचे लग्न झाले तरी तिचा वडिलांच्या जागी अनुकंपा तत्त्वावर (principle of compassion) मिळणाऱ्या नोकरीवर पूर्ण अधिकार आहे; असं नागपूर खंडपीठानं (Nagpur Bench) सांगितलं आहे.
त्याचं झालं असं…
वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडमध्ये काम करणाऱ्या राजू उसरे यांचा २०२० साली मृत्यू झाला. त्यांच्या पाश्चात पत्नी आणि दोन विवाहित मुली आहेत. आई आणि मोठ्या (Bombay High Court) बहिणीकडून सहमती घेऊन लहान मुलगी खुशबू चौतेल यांनी अनुकंपा आधारावर नोकरीसाठी अर्ज केला. पण ऑगस्ट २०२१ मध्ये खुशबू चौतेल हिचा अर्ज वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडकडून नाकारण्यात आला.
वडिलांच्या नोकरीवर मुलीचा पूर्ण अधिकार (Bombay High Court)
वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडतर्फे नॅशनल कोल वेज अॅग्रिमेंटमध्ये विवाहित मुलीला अनुकंपा आधारावर नोकरी देण्याची तरतूद नसल्याचे कारण देत हा अर्ज नाकारण्यात आला. त्यानंतर खुशबू चौतेल यांनी नागपूर खंडपीठात धाव घेतली. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने म्हटले की, मुलीचे लग्न झाले तरी तिचा वडिलांच्या जागी अनुकंपा तत्त्वावर मिळणाऱ्या नोकरीवर पूर्ण अधिकार आहे.
खुशबू यांच्या वतीने न्यायालयात बाजू मांडणाऱ्या (Bombay High Court) वकिलाने छत्तीसगड उच्च न्यायालयातील आशा पांडे विरुद्ध कोल इंडिया प्रकरणाचा दाखला देत विवाहित मुलीला नोकरी नाकारणे असंवैधानिक असल्याचे सांगितले. त्यावर न्यायाधीश अविनाश घरोटे आणि न्यायाधीश उर्मिला जोशी यांनी या प्रकरणात हा निर्णय दिला आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com