BOB Recruitment 2024 : ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी मोठी बातमी!! बँक ऑफ बडोदामध्ये 627 पदावर भरती सुरू

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । बँक ऑफ बडोदा अंतर्गत मोठी भरती जाहीर (BOB Recruitment 2024) करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून व्यावसायिक आणि मानव संसाधन पदांच्या एकूण 627 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 जुलै 2024 आहे.

बँकेत भरती होण्यासाठी अनेक तरुण इच्छुक असतात. बँकेतील नोकरी सुरक्षित नोकरी समजली जाते. वर्षभर मिळणारे बँक हॉलिडे यासह आठवड्याच्या सुट्या, भरघोस पगार, मिळणाऱ्या (BOB Recruitment 2024) इतर सोई सुविधा, कामाचे कमी तास यामुळे प्रत्येकाला बँकेत नोकरी करण्याची इच्छा असते. अशा उमेदवारांसाठी बँक ऑफ बडोदाने भरती जाहीर केली आहे. त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करायचा आहे. जाणून घ्या पद, पात्रता आणि अर्ज प्रक्रियेविषयी सविस्तर….

संस्था – बँक ऑफ बडोदा (BOB Recruitment 2024)
भरले जाणारे पद – व्यावसायिक आणि मानव संसाधन
पद संख्या – 627 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 जुलै 2024
वय मर्यादा – २५ ते ४८ वर्ष
अर्ज फी –
1. सामान्य, EWS आणि OBC उमेदवारांसाठी – ६००/- रुपये
2. SC, ST, PWD आणि महिलांसाठी – १००/- रुपये

भरतीचा तपशील – (BOB Recruitment 2024)

पदपद संख्या 
व्यावसायिक१६८ posts
मानव संसाधन४५९ posts

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
व्यावसायिकGraduation (in any discipline)
मानव संसाधनB. Tech/ B.E./ M Tech/ M.E., Graduation Relevant field

मिळणारे वेतन –

पदवेतन
व्यावसायिकMMGS II : Rs. 64820 x 2340 (1) – 67160 x 2680 (10) – 93960MMGS III : Rs. 85920 x 2680 (5) – 99320 x 2980 (2) – 105280SMG/S-IV : Rs. 102300 x 2980 (4) – 114220 x 3360 (2) – 120940
मानव संसाधन08 Lacs to 45 Lacs

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 2 जुलै 2024 आहे.
3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण (BOB Recruitment 2024) असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
4. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
5. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
PDF (Professional)
PDF (HR)
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा –
(Professional) – APPLY
(HR)
APPLY
अधिकृत वेबसाईट – www.bankofbaroda.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com