करिअरनामा ऑनलाईन । शैक्षणिक सत्र 2025-26 पासून सीबीएसई (CBSE) बोर्डाच्या परीक्षा (Board Exam) वर्षातून दोनवेळा घेतल्या जाण्याची शक्यता आहे. यासाठी शिक्षण मंत्रालयाने सीबीएसईला तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र सेमिस्टर परीक्षा पद्धत सुरू करण्याची कोणतीही योजना नसल्याची माहिती समोर येत आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार शिक्षण मंत्रालय आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ चे अधिकारी पुढील महिन्यात शाळांच्या मुख्याध्यापकांशी वर्षातून दोनदा बोर्ड परीक्षा घेण्याबाबत (Board Exam) विचारविनिमय करणार आहेत. CBSE सध्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशाच्या वेळापत्रकावर परिणाम न करता शैक्षणिक दिनदर्शिकेत बदल कसा करायचा यावर काम करत आहे.
वर्षातून दोनदा घेतल्या जाणार परीक्षा (Board Exam)
काही महिन्यांपूर्वी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी याविषयी घोषणा केली होती. त्यानंतर शिक्षण मंत्रालय आणि CBSE ने त्या दृष्टीने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. मात्र, शिक्षण मंत्रालय आणि CBSE बोर्डाकडून सेमिस्टर पद्धत लागू करण्याची कोणतीही योजना नाही. विद्यार्थ्यांना (Board Exam) कामगिरी सुधारण्यासाठी पुरेसा वेळ आणि संधी मिळावी यासाठी शिक्षण मंत्रालयाने गेल्या वर्षी जाहीर केलेल्या नवीन अभ्यासक्रम फ्रेमवर्क (NCF) नुसार बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जाणार आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com