Board Exam : उत्तर पत्रिका स्विकारण्यास शिक्षकांचा नकार; 10 वीच्या 50 लाख तर 12 वीच्या 80 लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी (Board Exam) सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप दिवसेंदिवस तीव्र होत आहे. या संपाचा दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीला फटका बसला आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार घातला आहे. त्यामुळे दहावीच्या सुमारे 50 लाख उत्तरपत्रिका, तर बारावीच्या सुमारे 80  लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून आहेत, असा दावा संघटनांनी केला आहे. परिणामी दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या निकालाला विलंब होणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी संपाचे हत्यार उपसले आहे. या संपात शिक्षकही सहभागी झाले आहेत. सध्या शिक्षकांकडून दहावी आणि (Board Exam) बारावीची परीक्षा घेतली जात आहे. मात्र, जुन्या पेन्शनची मागणी मान्य होईपर्यंत उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार घालण्याचा पवित्रा शिक्षकांनी घेतला आहे.

त्यामुळे 14 मार्चपासून उत्तरपत्रिका स्वीकारणे आणि तपासणीचे काम शिक्षकांनी पूर्णपणे थांबवले आहे. त्यामुळे लाखो उत्तरपत्रिका तपासणीविना बोर्डाच्या कार्यालयात पडून आहेत. त्यातच (Board Exam) बारावीच्या परीक्षा सुरू झाल्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले होते.
बारावीच्या उत्तरपत्रिका 27 फेब्रुवारीपर्यंत बोर्डाकडे पडून होत्या. बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीला आधीच विलंब झाला आहे. त्यात आता पुन्हा शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीचे काम थांबविले आहे. त्यामुळे निकालाला विलंब होणार असून, त्याचा फटका पुढील वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेला बसण्याची भीती पालकांकडून व्यक्त केली जात आहे.

“सरकारचा जुन्या पेन्शनचा निर्णय होईपर्यंत शिक्षकांचा उत्तरपत्रिका (Board Exam) तपासणीवर बहिष्कार आहे. सध्या परीक्षा सुरू आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी परीक्षा घेतल्या जात आहेत. मात्र, शिक्षक उत्तरपत्रिका स्वीकारत नाहीत. त्यामुळे बोर्डाकडे उत्तरपत्रिका पडून आहेत. सद्यस्थितीत दहावीच्या सुमारे ५० लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून आहेत”; अशी माहिती महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) अध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे यांनी दिली.
तर “सध्या बारावीच्या सुमारे 80 लाख उत्तरपत्रिकांची (Board Exam) तपासणी बाकी आहेत. यातील अनेक उत्तरपत्रिका बोर्डाकडे पडून आहेत. शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्णपणे थांबवले आहे;” असे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे समन्वयक प्रा. मुकुंद आंधळकर यांनी सांगितले.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com