करिअरनामा ऑनलाईन। अनेक मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर आता महाराष्ट्रात (Big News) दोन मोठे प्रकल्प येणार आहेत. केंद्र सरकारच्या वतीने ही घोषणा करण्यात आली आहे. पुण्यात 1 हजार 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. इलेकट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर आणि CDAC या दोन कंपनी पुण्यात गुंतवणूक करणार आहेत. केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ही माहिती दिली आहे.
इलेकट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर ही कंपनी 600 कोटींची गुंतवणूक करणार आहे. तर CDAC ही कंपनी 1 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. त्यामुळे एकूण 1 हजार 600 कोटी रुपयांची गुंतवणूक या दोन कंपनी पुण्यात करणार आहेत.
महाराष्ट्राला दिलासा (Big News)
सध्या अनेक प्रकल्प राज्याबाहे गेल्यानंतर आता महाराष्ट्रासाठी एक दिलासादायक बातमी आहे. दोन प्रकल्प महाराष्ट्रात येणार असल्याची घोषणा केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक तरूणांना रोजगार मिळणार आहे.
आपल्या राज्यातून प्रकल्प बाहेर जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती. स्थानिक तरूणांमध्येही नाराजी होती. आपल्याला रोजगार मिळणारा उद्योग राज्याबाहेर जाणार असल्याने तरूणाईत नाराजी होती. पण आता काहीसा दिलासा मिळाला आहे.
Delhi | Today we have approved the Electronics Manufacturing Cluster (EMC) proposal in Ranjangaon, Pune. I hope this is the beginning of the expanison of the electronic ecosystem in Maharashtra: Union MoS Electronics & IT Rajeev Chandrasekhar pic.twitter.com/6kwcPZbK45
— ANI (@ANI) October 31, 2022
काही दिवसांआधी टाटा एअरबस हा प्रकल्प नागपुरातून गुजरातला गेला.त्यानंतर कालही आणखी एक प्रकल्प नागपुरातून राज्याबाहेर गेलाय. सॅफ्रन ग्रुपचा प्रकल्प (Big News) आता हैदराबादला गेला आहे. नागपूरच्या मिहानमध्ये हा प्रकल्प होणार होता पण आता हा प्रकल्प हैदराबादला गेला असल्याची माहिती आहे. फ्रेंच कंपनी सॅफ्रन ग्रुपचा विमान आणि रॉकेट इंजिन बनवण्याचा हा प्रकल्प आहे. सॅफ्रन कंपनी मिहानमध्ये 1 हजार 185 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यार होती. मात्र आता हा प्रकल्प हैदराबादला गेला असल्याची माहिती आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com