BEL Recruitment 2023 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत ‘या’ पदावर भरती सुरु; पहा पात्रता

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत (BEL Recruitment 2023) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ज्युनियर पर्यवेक्षक (सुरक्षा), हवालदार (सुरक्षा) पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2023 आहे.

संस्था – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL)
भरले जाणारे पद –
1. ज्युनियर पर्यवेक्षक (सुरक्षा) – 01 पद
2. हवालदार (सुरक्षा) – 05 पदे
पद संख्या – 06 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 ऑगस्ट 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – व्यवस्थापक एचआर, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, प्लॉट नं. एल-1, तळोजा, नवी मुंबई-410208

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – 43 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत (BEL Recruitment 2023)
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. ज्युनियर पर्यवेक्षक (सुरक्षा) – SSLC + 15 years of service in Indian Armed Forces and JCO rank
2. हवालदार (सुरक्षा) – SSLC + 15 years of service in Indian Armed Forces and JCO rank

मिळणारे वेतन –
1. ज्युनियर पर्यवेक्षक (सुरक्षा) – WG- VII Rs. 24,500-3%-90,000
2. हवालदार (सुरक्षा) WG – VII Rs. 24,500-3%-90,000
असा करा अर्ज –
1. या भारतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज करणे अनिवार्य आहे.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी (BEL Recruitment 2023) नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अर्जाचा फॉर्म जाहिराती खालील लिंकमध्ये प्रदान केला आहे
5. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.bel-india.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com