करिअरनामा ऑनलाईन | जेव्हा बी पेरल्यानंतर ते एक रोपाचे रूप धारण करते, तेव्हा चांगले वाटते. पण जेव्हा आपल्याला गोड फळांनी भरलेले झाड दिसते तेव्हा खरा आनंद मिळतो. बिहार राज्यातील रोहतास जिल्ह्यातील सूर्यपुरा वरुण येथील शेत मजुराचा मुलगा उज्ज्वल अनुराग आयआयटीची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाला त्याच्या बाबतीत ही म्हण योग्य लागू होईल. त्याच्या अथक परिश्रमाने तो आयआयटी बीएचयूमधून बीटेक मध्ये प्रवेश घेण्यासाठी तो पात्र ठरला.
अभ्यासात खूप मेहनती असल्याने प्रत्येक ठिकाणी जाईल तिथे त्याच्या शिक्षकांची मने तो जिंकून घेत होता. आपल्या मुलाची शिकण्याची तळमळ आणि त्याचे दहावीचे गुण पाहून त्याच्या वडिलांना खूप आनंद झाला. आणि त्यांनी त्याला पुढे शिकविण्याचे मान्य केले. दोन वर्षांच्या अभ्यासानंतर त्यांने आयआयटी प्रवेश परीक्षा दिली. आणि पहिल्याच प्रयत्नात तो यशस्वी देखील झाला. त्यानंतर त्याला आयआयटी बीएचयूमध्ये प्रवेश मिळाला. त्याच्या आयआयटी प्रवेशाने त्याचे आई वडील खूपच आनंदी झाले आहेत.
बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील रहिवासी असलेले, आरके श्रीवास्तव हे त्याचे गुरू आहेत. आणि, त्यांचा या प्रवासात मोलाचा वाटा आहे अश्या भावना उज्ज्वलने व्यक्त केल्या. अजूनही खूप मेहनत घेऊन नवीन शिखरे सर करायची असल्याची भावना त्याने व्यक्त केली.
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com