करिअरनामा ऑनलाईन । केंद्र सरकारच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली (Banking Questions and Answers) असलेल्या वित्तीय सेवा संस्था ब्युरो म्हणजेच Financial Services Institutions Bureau या संस्थेची जबाबदारी काय आहे, हे जाणून घेणे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आवश्यक आहे. या नव्या संघटनेने कोणाची जागा घेतली आहे? यासारखे काही प्रश्न असे आहेत, जे बँक भरतीसह विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाऊ शकतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला याबाबतचे काही प्रश्न आणि त्यांच्या उत्तराची माहिती करुन देणार आहोत.
Financial Services Institutions Bureau –
केंद्र सरकारने वित्तीय सेवा संस्था (FSIB) ची स्थापना केली आहे. ही संस्था 1 जुलै 2022 पासून कार्यरत आहे. 1 एप्रिल 2016 रोजी केंद्र सरकारने स्थापन (Banking Questions and Answers) केलेल्या बँक्स बोर्ड ब्युरोची जागा FSIBने घेतली आहे. FSIB ही केंद्र सरकारच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील एक स्वतंत्र संस्था आहे. बँकिंग वित्तीय क्षेत्रामध्ये सुधारणा करणे आणि त्यावर देखरेख ठेवणे, या उद्देशाने त्याची स्थापना करण्यात आली. विमा कंपन्यांसह इतर वित्तीय संस्थाही याच्या कक्षेत येतात.
या ब्युरोचे काम काय असतं? (Banking Questions and Answers)
सरकारी विमा कंपन्या, वित्तीय संस्था, सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि पूर्णवेळ संचालकांसह इतर वरिष्ठ पदांवर नियुक्तीची शिफारस करणे ही या संस्थेची मुख्य जबाबदारी आहे. या सर्व संस्थांमध्ये नेतृत्व विकास हा देखील त्यांच्या अजेंड्यात समाविष्ट आहे. संस्थेला मानव संसाधन विकासाबाबत सल्ला देणे, सुरू असलेल्या कामांवर लक्ष ठेवणे आणि गरज पडल्यास कारवाई करण्याचे अधिकारही त्यांच्याकडे आहेत.
कोण आहेत वित्तीय सेवा संस्था ब्युरोचे अध्यक्ष
FSIB मध्ये अध्यक्षांचे पद हे सर्वोच्च असते. या पदावरील नियुक्ती केंद्र सरकारकडून केली जाते. भानू प्रताप शर्मा यांची सध्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे, ते बँक बोर्ड ब्युरोचे अध्यक्ष होते. संस्थेचे नाव, काम आणि जबाबदारी बदलल्यावर शर्मा यांना अध्यक्ष करण्यात आले. यांचे (Banking Questions and Answers) मुख्यालय मुंबईत आहे. तसेच संस्थेची चार प्रादेशिक कार्यालये दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि बंगळुरू येथे उघडली जाणार आहेत. ही संघटना स्थापन झाल्यापासून अधीनस्थ कंपन्यांमध्ये कॉर्पोरेट कल्चर वाढले आहे.
जाणून घ्या पदाधिकाऱ्यांविषयी
नुकतीच जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे जी. एम एन. रामा स्वामी यांची GIC चे अध्यक्ष/MD म्हणून पदोन्नती आणि निवड करण्यात (Banking Questions and Answers) आली. युनायटेड इंडिया इन्शुरन्सचे जीएम/संचालक एम राजेश्वरी सिंग यांची राष्ट्रीय विमा कंपनीच्या सीएमडी म्हणून नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली आहे.
रामास्वामी सप्टेंबरपासून पदाची नवीन जबाबदारी स्वीकारतील. त्यांची नियुक्ती दोन वर्षांसाठी करण्यात आली आहे. ते देवेश श्रीवास्तव यांची जागा घेतील. तर सुचिता गुप्ता यांच्या जागी एम राजेश्वरी सिंग नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्या नवीन सीएमडी म्हणून नियुक्त होणार आहेत. सुचिता ऑगस्टपर्यंत आपली जबाबदारी सांभाळणार आहेत. त्याच संस्थेने सतपाल भानू आणि आर. दोराईस्वामी यांची भारतीय आयुर्विमा महामंडळाचे नवीन एमडी म्हणून नियुक्ती केली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com