Banking Job : पदवीधर उमेदवारांना बँकेत नोकरीची उत्तम संधी; ‘इथे’ करा अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । दि पुसद अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, पुसद (Banking Job) अंतर्गत भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कंत्राटी सेवक पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2024 आहे.

संस्था – दि पुसद अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, पुसद
भरले जाणारे पद – कंत्राटी सेवक (Banking Job)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जुलै 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – दि पुसद अर्बन को- ऑप बँक लि. पुसद मुख्य कार्यालय, तलाव ले-आउट पुसद जि. यवतमाळ पी. नं. 445204

नोकरी करण्याचे ठिकाण – पुसद, जि. यवतमाळ
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे.
असा करा अर्ज – (Banking Job)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी वर दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2024 आहे.
3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
4. दिलेल्या तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
5. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिकृत वेबसाईट – https://pusadurbanbank.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com