Banking Job : पुणे पीपल्स को-ऑप बँकेत नवीन उमेदवारांना नोकरीची संधी; पात्रता 10वी/12वी ते ग्रॅज्युएट

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । पुणे पीपल्स को-ऑप बँक लिमिटेड अंतर्गत (Banking Job) भगिनी निवेदिता सहकारी बँक, पुणे येथे विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मुख्य महाव्यवस्थापक, अधिकारी आणि सफाई कामगार व्यवस्थापक पदाच्या 22 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2023 आहे.
संस्था – पुणे पीपल्स को-ऑप बँक लिमिटेड अंतर्गत भगिनी निवेदिता सहकारी बँक, पुणे
भरले जाणारे पद –
1. मुख्य महाव्यवस्थापक – 1 पद
2. अधिकारी – 15 पदे
3. सफाई कामगार व्यवस्थापक – 6 पदे
पद संख्या – 22 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मे 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
वय मर्यादा – (Banking Job)
1. मुख्य महाव्यवस्थापक – 35 ते 60 वर्ष
2. अधिकारी – 25 ते 40 वर्ष
3. सफाई कामगार व्यवस्थापक – 21 ते 33 वर्ष
अर्ज फी –
1. अधिकारी पदासाठी – रु. 1000 + 18% GST = Rs. 1180/-
2. मुख्य महाव्यवस्थापक, सफाई कामगार व्यवस्थापक पदासाठी – शुल्क नाही
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मे 2023
निवड प्रक्रिया – मुलाखत (Banking Job)

आवश्यक  शैक्षणिक पात्रता –
1. मुख्य महाव्यवस्थापक – मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असल्यास प्राधान्य. CAIIB, DBF / DCBM / or CA / ICWA, / पदव्युत्तर
बँकिंग क्षेत्रातील मध्यम / वरिष्ठ व्यवस्थापकीय स्तरावरील कामकाजाचा किमान ८ वर्षाचा अनुभव. मराठी भाषेचे ज्ञान असल्यास प्राधान्य
2. अधिकारी – मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी व (एम.एस.सी.आय.टि. किंवा समतुल्य संगणक प्रमाणपत्र)
सहकारी बँकेतील / इतर वित्तीय संस्थेमधील ऑफिसर या पदावर काम केल्याचा किमान 3 वर्षाचा अनुभव किंवा सिनिअर लेखनिक या पदावर काम (Banking Job) केल्याचा किमान 5 वर्षाचा अनुभव आवश्यक. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
3. सफाई कामगार व्यवस्थापक – 10 वी पास असणे आवश्यक. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
मिळणारे वेतन –
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे.
3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2023 आहे.

निवड प्रक्रिया –
1. या भरतीकरीता मुख्य महाव्यवस्थापक, सफाई कामगार व्यवस्थापक पदांसाठी निवड प्रकिया मुलाखतीद्वारे घेण्यात येणार आहे. (Banking Job)
2. तसेच, अधिकारी पदांसाठी निवड प्रक्रिया ऑनलाइन वस्तुनिष्ठ लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे होणार आहे.
3. ऑनलाइन वस्तुनिष्ठ लेखी परीक्षा ही पुणे येथे घेतली जाईल.
4. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता संबंधित तारखेला आवश्यक मुळ कागदपत्रे व छायांकित प्रमाणपत्रासह दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
5. मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
काही महत्वाच्या लिंक्स – (Banking Job)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK  करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.punepeoplesbank.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com