Banking Job : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत ‘या’ पदांवर नोकरीची संधी; मिळेल 90 हजारापर्यंत पगार

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य सहकारी (Banking Job) बँक लिमिटेड, मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 20 पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2023 आहे.

बँक – महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड, मुंबई
पद संख्या – 20 पदे (Banking Job)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 डिसेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – डेप्युटी जनरल मॅनेजर, एचआरडी अँड एम विभाग, महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई, सर विठ्ठलदास ठाकरसे स्मृती भवन, 9, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन, फोर्ट, मुंबई – 400 001

भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. व्यवस्थापक – 10 पदे
B.E/ B. Tech
2. सहव्यवस्थापक – 02 पदे
B.E/ B. Tech
3. सहायक व्यवस्थापक – 06 पदे
B.E/ B. Tech
4. उप महाव्यवस्थापक – 02 पदे
किमान II वर्ग असलेल्या कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष पदवी. अतिरिक्त पात्रता जसे की JAIIB/CAIIB ला प्राधान्य दिले जाईल

वय मर्यादा – 35 ते 59 वर्षे
नोकरीचे ठिकाण – मुंबई
मिळणारे वेतन – (Banking Job)
1. व्यवस्थापक- 77,000/- रुपये दरमहा
2. सहव्यवस्थापक -65,000/- रुपये दरमहा
3. सहायक व्यवस्थापक -62,000/- रुपये दरमहा
4. उप महाव्यवस्थापक -90,000/- रुपये दरमहा

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
PDF 1
PDF 2
अधिकृत वेबसाईट – https://www.mscbank.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com