करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या (Aviation Industry Jobs) तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशाच्या विमान क्षेत्रात तुम्हाला नोकरी मिळण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. विमान उद्योगात मोठ्या प्रमाणावर विस्तार होत असून या अनुषंगाने विमान यंत्रणा सुस्थितीत चालविण्यासाठी विविध विभागांत मनुष्यबळाची आवश्यकता निर्माण झाली आहे. मनुष्यबळाची पूर्तता करण्यासाठी लवकरच 1212 पदांची भरती केली जाणार आहे. ही भरती प्रामुख्याने नागरी विमान महासंचालनालय (डीजीसीए), एअरपोर्ट इकोनॉमिक रेग्युलेटरी अथॉरिटी व एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया या विभागांत केली जाणार आहे.
का आहे मनुष्यबळाची गरज?
हाती आलेल्या माहितीनुसार, ज्या प्रमाणात विमान कंपन्यांतर्फे नव्या विमानांची खरेदी तसेच नव्या मार्गांवर विस्तार केला जात आहे, त्याकरिता विमान प्रवासासाठी पायाभूत सुविधा देणाऱ्या यंत्रणेत देखील मनुष्यबळाची आवश्यकता निर्माण झाली आहे. याची सुरुवात डीजीसीएकडून करण्यात (Aviation Industry Jobs) आली आहे. या विभागात ४१६ नव्या जागांची भरती होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने हवाई वाहतूक नियंत्रक, विमानाचे इंजिनिअर, वैमानिक अशा महत्त्वाच्या पदांची भरती करण्यात येणार आहे. तर, देशातील विमानतळांचे व्यवस्थापन व देखभाल करणाऱ्या भारतीय विमान प्राधिकरणात देखील ७९६ नव्या पदांची भरती करण्यात येणार आहे. यापैकी ३४० पदांची भरती मे २०२२ मध्ये करण्यात आली आहे. या खेरीज, विमान उद्योगातील आर्थिक शिस्तीचे नियमन करणाऱ्या एअरपोर्ट इकोनॉमिक रेग्युलेटरी अथॉरिटीमध्ये देखील १० जागा भरण्यात येणार आहेत.
कोणकोणती पदे भरली जाणार (Aviation Industry Jobs)
या क्षेत्रात विविध विभागात उमेदवारांची भरती करावी लागणार आहे. पायलट, केबिन क्रू, सर्व तांत्रिक व विनातांत्रिक विभागासाठी आगामी काळात कर्मचारी लागणार आहेत. एअर इंडियाचे माजी कार्यकारी संचालक जितेंद्र भार्गव यांच्या मते, एअर इंडियाला अनुभवी पायलट, केबिन क्रू सदस्य, देखभाल इंजिनियरिंग, ग्राउंड क्रू आदींची गरज लागेल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com