करिअरनामा ऑनलाईन । आर्या तावरेने (Arya Taware) वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी एक स्टार्टअप सुरु केला आणि बघता बघता आर्या ने ‘फोर्ब्ज’च्या यादीत स्थान पटकावले. आर्याच्या या कामगिरीमुळे तिने महाराष्ट्रासोबत देशाचे नाव उंचावर पोहचवले आहे. लंडनमधील छोट्या बांधकाम व्यावसायिकांना पैसा उपलब्ध करून देण्यासाठी आर्याने व्यवसाय सुरु केला होता. तिच्या या कामाची दखल जगप्रसिधद ‘फोर्ब्ज’ मासिकाने घेतली आहे. या कामगिरीबद्दल तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
I made it to @Forbes' 30 Under 30!!! 🥳🎉
Feeling incredibly grateful and honoured to be recognised for my work with @Future_Bricks. This is just the beginning! 💪🏼 #ForbesUnder30 @ForbesUnder30
— Arya Taware (@arya_taware) May 4, 2022
फोर्ब्ज मासिकाने युरोपमधील आर्थिक क्षेत्रातील 30 वर्षांखालील 30 प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये आर्या तावरेने स्थान मिळवले आहे. आर्थिकदृष्ट्या प्रभावशाली समजल्या जाणाऱ्या पहिल्या 30 व्यक्तींच्या यादीमध्ये आर्याच्या नावाचा समावेश आहे. पण आर्या तावरे नक्की कोण आहे? तिनं असं काय केलं कि थेट फोर्ब्सच्या यादीत ती झळकली? आर्यानं सुरु केलेली कंपनी काय काम करते याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. कदाचित हे वाचून तुम्हालाही काही प्रेरणा मिळेल अन काय सांगावं तुमच्यातीलही एखाद्याचा भन्नाट स्टार्टअप अशाच कुठंतरी झळकेल.
कोण आहे आर्या तावरे (Arya Taware) ?
आर्या तावरे मुळची बारामतीची आहे. तिचे कुटुंब बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील आहे. तिचे वडील कल्याण तावरे बांधकाम व्यावसायिक आहेत. आर्या सध्या लंडनमध्ये वास्तव्यास आहे. पुण्यातून बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यावर तिने युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधून ‘अर्बन प्लॅनिंग अँड रिअल इस्टेट फायनान्स’ या विषयात पदवी संपादित केली.
आर्याने इतक्या कमी वयात स्वतःचा स्टार्टअप कसा सुरु केला?
लंडन युनिव्हर्सिटीतुन पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर आर्याला तेथेच एक नोकरी मिळाली. नोकरी करत असताना तेथील बांधकाम व्यावसायिकांना निधी उभारणीसाठी अडचणी येत असलायचं आर्याच्या लक्षात आलं. यानंतर आर्याने त्याचा अभ्यास केला. अन येथूनच सुरु झाला आर्याच्या स्टार्टअपचा प्रवास. बांधकाम व्यावसायिकांना येणाऱ्या अडचणी आर्याने बारकाईने समजून घेतल्या तेव्हा तिला त्यावर एक उपायसुद्धा सापडला. अन याच आयडियावर आर्याने स्वतःची स्टार्ट अप कंपनी सुरु करण्याचा निर्णय घेतला. Arya Taware
आर्याने सुरु केलेल्या कंपनीचं बाजारमूल्य ३०० कोटी
आर्याची कामगिरी साधीसुधी नाही. बांधकाम व्यावसायिकांच्या क्षेत्रातील विशेषज्ञांना तसेच गुंतवणूकदारांना एकत्र आणणारे पोर्टल म्हणूनही तिच्या स्टार्टअपने भूमिका बजावली आहे. ‘फ्युचरब्रीक्स’ असं तिच्या कंपनीचं नाव आहे. या कंपनीचे आजचे बाजारमूल्य 32.7 कोटी पौंड इतके आहे. म्हणजेच भारतीय मूल्यात याची किंमत ३०० कोटींहून अधिक आहे. ही कंपनी आज 22 वेगवेगळ्या बांधकाम प्रकल्पांवर काम करत आहे.
आज एका मराठी मुलीच्या हाताखाली ब्रिटिश लोक करतात काम
नव उद्योजकांना उद्योग सुरू करताना सुरुवातीला निधी उभा करण्यात अडचण निर्माण झाली. परंतु आर्याने निधी उभारणीची अडचण दूर करण्यासाठी ‘क्राऊड फंडींग’ ही नवीन संकल्पना आणली आणि त्यात तिला यश मिळाले. तिने (Arya Taware) कंपनी सुरु करुन बांधकाम व्यवसायातील विविध अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला. आज तिच्या हाताखाली ब्रिटीश लोक काम करतात ही अभिमानास्पद बाब आहे. लंडनमध्ये काम करताना तेथील व्यावसायिकांना ज्या अडचणी येत होत्या त्याचा अचूक अभ्यास करुन आर्याने या अडचणींवर मात केली आहे.
‘महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच सुट्टीच्या काळात आर्याने लंडनमधील बांधकाम व्यावसायिकांकडे काम केले. त्या वेळी तेथील लघू व मध्यम बांधकाम विकासकांना निधी उपलब्धतेच्या समस्या भेडसावत असल्याचे तिच्या लक्षात आले. या समस्या सोडविण्यासाठी तिने ‘क्राउड फंडिंग’ संकल्पनेवर काम करण्यास सुरुवात केली. तिच्या कामगिरीची दखल घेत विद्यापीठाने तिला प्रोत्साहन देऊन स्वतंत्र कार्यालय व यंत्रणा उपलब्ध करून दिली आहे. आर्याचा स्टार्ट अप वेगाने विस्तारत असून तिच्या कंपनीचे मूल्य ३५० ते ४०० कोटींवर पोहोचले आहे. अनेक मोठ्या फायनान्स करणाऱ्या कंपन्या तिच्या कंपनीशी जोडल्या गेल्या आहेत. Arya Taware
काटेवाडीची आर्या फोर्ब्सच्या यादीत झळकने हि अभिमानाची बाब
‘फोर्ब्स’सारख्या आंतरराष्ट्रीय मासिकाने आर्याच्या कामगिरीची दखल घेणे हि बाब आमच्यासाठी अभिमानाची आहे. ‘फोर्ब्स’ मासिकातील प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत आर्याच्या रूपाने मराठी मुलीचा समावेश झाला असून, तिच्या कंपनीला आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली आहे, असं मत आर्याचे वडील कल्याण तावरे यांनी व्यक्त केलं आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत आर्याच्या कामगिरीचं कौतुक केलंय
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com