Artificial Intelligence : AI मुळे नोकऱ्या जाणार की वाढणार? पहा जाणकार काय सांगतात…

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । आर्टिफिशियल इंटेलिजेंस हे तंत्रज्ञान (Artificial Intelligence) जगभरात प्रगती करत आहे. हे तंत्रज्ञान इतकं वेगानं प्रगती करत आहे, की पुढे जाऊन हे तंत्रज्ञान माणसांची जागा देखील घेईल अशी भीती वर्तवली जात आहे. यामुळे तरुणांच्या नोकऱ्यांना सर्वात मोठा फटका बसेल, यावर जास्त चर्चा रंगत आहे. या सगळ्या वृत्तांचे खंडण केलं आहे मायक्रोसॉफ्टचे एग्जीक्यूटिव डायरेक्टर, समिक रॉय यांनी. ते म्हणतात; “AI मुळे भविष्यात नोकऱ्या जाणार नाहीत.” याचे कारण देखील त्यांनी सर्वांना सांगितले आहे. जाणून घेवूया…

AI (AI) विषयी बोलताना समिक रॉय म्हणाले की, “AI हे तंत्रज्ञान लोकांचे कौशल्य सुधारण्यासाठी तयार करण्यात आले आहे. जगात अनेक ऍप्लिकेशन्स आहेत, पण जेव्हा नोकऱ्या निर्माण करण्याचा आणि प्रदान करण्याचा विचार येतो, तेव्हा आपण थोडे मागे जाऊया….वीज, स्टीम इंजिन आणि संगणकाच्या सुरुवातीकडे. या सर्वांनी जग बदलले आहे. या गोष्टी जगासाठी नवीन होत्या, पण त्यांनी लोकांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे. AI भविष्यातील नोकऱ्यांची लवचिकता आहे त्यामुळे नोकऱ्यांना धोका निर्माण होणार नाही.”

रॉय यांनी पुढे सांगितले; “भारतात संगणक आल्यावर देशात आयटी कंपन्या उदयास आल्या, ऑनलाइन व्यापार सुरू झाला, यामुळे थेट नोकऱ्यांमध्ये वाढ झाली. यावेळी आम्हाला AI सह आमचे कौशल्य सुधारावे लागेल. एआयमुळे नोकऱ्या जाणार नाहीत, लोकांना फक्त एआय स्वीकारावे लागेल एवढंच.”
सध्याच्या घडीला एआयमुळे कोणतीही डिजिटल गोष्ट करणे शक्य होत आहे. यामुळे भविष्यात AI ची प्रगती झाल्यानंतर माणसांची गरज देखील भासणार नाही असा दावा केला (Artificial Intelligence) जात आहे. मात्र मोठमोठ्या कंपन्यांचे अधिकारी हा दावा फेटाळून लावताना दिसत आहेत. तसेच, AI मुळे नोकऱ्या जाणार नाहीत तर नोकऱ्यांमध्ये वाढ होईल; असा विश्वास त्यांच्याकडून व्यक्त केला जात आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com