करिअरनामा ऑनलाईन । केवळ मे महिन्यात टेक क्षेत्रातील (Artificial Intelligence) सुमारे चार हजार लोकांना एआयमुळे आपली नोकरी गमवावी लागली आहे. काही दिवसांपूर्वीच चॅट जीपीटीचे फाऊंडर सॅम अल्टमन यांनी एआयच्या धोक्यांबाबत इशारा दिला होता. त्यांनी दिलेला हा इशारा आता खरा ठरत असल्याचं यावरुन दिसत आहे.
2022 साली नोव्हेंबर महिन्यात ओपन एआय (OpenAI) कंपनीने चॅटजीपीटी हा एआय चॅटबॉट लाँच केला होता. त्यानंतर गुगल आणि मायक्रोसॉफ्टनेही आपापले चॅटबॉट्स लाँच केले. केवळ फोटो, व्हिडिओ एडिटिंगपुरतं एआय मर्यादित न राहता, चक्क कोडिंग करणारे आणि कित्येक टेक्निकल कामे करू शकणारे एआय सॉफ्टवेअर समोर आले आहेत.
बिझनेस इन्साईडरने इतर काही संस्थांचा डेटा कलेक्ट करून याबाबत रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. यावर्षीच्या मे महिन्यात जगभरातील तब्बल 80,000 लोकांना आपली नोकरी (Artificial Intelligence) गमवावी लागली. यातील 3,900 लोकांची नोकरी आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे गेली असल्याची माहिती देण्यात आली आहे. इतर लोकांची नोकरी कॉस्ट कटिंग, मर्जर, रिस्ट्रक्चरिंग अशा कारणांमुळे गेली असल्याचं यात म्हटलं आहे.
किती जणांनी गमावली नोकरी (Artificial Intelligence)
यावर्षी जानेवारी ते मे दरम्यान जगभरात सुमारे 4 लाख लोकांना आपली नोकरी गमवावी लागली असल्याचंही या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आलं. मात्र, एआयमुळे एवढ्या प्रमाणात नोकरी जाण्याची ही पहिलीच वेळ होती.
AI ने घेतली माणसांची जागा
फेब्रुवारी महिन्यात सुमारे एक हजार (Artificial Intelligence) कंपन्यांचा सर्व्हे घेण्यात आला होता. यामध्ये असं दिसून आलं, की अमेरिकेतील कित्येक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या जागी चॅटजीपीटी किंवा अन्य चॅटबॉट्सना प्राधान्य देत आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com