Army Recruitment : सैन्य दलातील भरतीसाठी मिळवा मोफत प्रशिक्षण!! इच्छुकांना अर्ज करण्याचं आवाहन

Army Recruitment
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये (Army Recruitment) अधिकारी पदावर भरती होण्यासाठी कंम्बाइंड डिफेन्स सर्व्हीसेस (CDS) परीक्षेची पूर्वतयारी करून घेतली जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांकरिता नाशिक जिल्ह्यात छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड येथे आयोजित करण्यात आले आहे. दि. १० जून ते २३ ऑगस्ट २०२४ या कालावधीत सीडीएस कोर्स क्रमांक ६३ चे प्रशिक्षण घेतले जाणार आहे. उमेदवारांना येत्या ४ जून २०२४ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची निःशुल्क व्यवस्था
या कोर्ससाठी आलेल्या प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन आणि (Army Recruitment) प्रशिक्षणाची व्यवस्था निःशुल्क करण्यात येणार आहे. मुलाखतीस येण्यापूर्वी उमेदवारांनी डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेल्फेअर, पुणे (DSW) यांच्या https://mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर वरुन सीडीएस ६3 कोर्ससाठी प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट पूर्ण भरून तीन प्रत सोबत घेऊन यायची आहे.

आवश्यक पात्रता – (Army Recruitment)
1. कंम्बाइंड डिफेन्स सर्व्हीसेस परीक्षेच्या पूर्व तयारी कोर्ससाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
2. उमेदवाराने केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या सीडीएस परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज केलेला असावा.

कार्यालयीन पत्ता – प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र , नाशिक रोड, नाशिक
E-MAIL ID – [email protected]
दूरध्वनी क्रमांक – ०२५३-२४५१०३२
भ्रमणध्वनी क्रमांक – ९१५६०७३३०६ येथे इच्छुक उमेदवारांनी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, लेफ्टनंट कर्नल स.दै. हंगे (नि.) यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com