Apple Jobs in India : Apple सोबत जॉब करण्याचा गोल्डन चान्स!! कंपनी ‘या’ दोन पदांवर भारतात करणार मोठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । IT इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर नोकर (Apple Jobs in India) कपात सुरु असताना आघाडीच्या अ‍ॅपल कंपनीने मात्र मोठ्या प्रमाणावर नोकरभरती घोषित केली आहे. कंपनीने भारताच्या वेबसाइटवर अनेक पदांवरील भरती संदर्भात अधिसूचना जाहीर केली आहे. त्यात बहुतांश पदं बिग डेटा सॉफ्टवेअर इंजिनीअर्स आणि DevOps इंजिनीअर्सची आहेत. ‘कंटेंट डॉट टेकगिग डॉट कॉम’ने त्याबाबत वृत्त दिलं आहे.

का होतेय मोठी नोकर भरती (Apple Jobs in India)

अ‍ॅपल कंपनी भारतात त्यांची फ्लॅगशिप स्टोअर्स उघडण्याच्या तयारीत आहे. 2015 पासून त्यांचं त्याबाबत काम सुरू आहे. कंपनीच्या सध्याच्या मोठ्या नोकरभरतीवरून लवकरच अ‍ॅपल ही दुकानं सुरू करणार असल्याचं चित्र आहे.

1. बिग डेटा सॉफ्टवेअर इंजिनीअर्स
कोठे होणार भरती –

बिग डेटा सॉफ्टवेअर इंजिनीअर्सची (Apple Jobs in India) पदभरती कंपनीच्या बेंगळुरू इथल्या ऑफिसमध्ये होणार आहे.

जॉब प्रोफाइल 

या पदासाठी इच्छुक उमेदवाराकडे विविध जबाबदाऱ्या हुशारीने सांभाळण्याची हातोटी हवी. तसेच उमेदवाराला नियोजित वेळेत सोल्युशन्स देता यायला हवीत. उमेदवाराला 12X7 ऑन कॉल रोटेशनमध्ये सहभागी व्हावं लागेल. प्रॉडक्शन संदर्भातल्या समस्यांचं त्वरित निराकरण (Apple Jobs in India) करण्याची जबाबदारी उमेदवारावर असेल. एकापेक्षा जास्त टीम्ससोबत काम करण्याची सवय उमेदवाराला हवी. पात्र उमेदवाराला Kubernetes किंवा container orchestration frameworks चा अनुभव घेता येईल. 100 टेराबाइट्स डेटासह मोठ्या Hadoop/S3 क्लस्टरमधला अनुभवही मिळेल.

आवश्यक पात्रता
  1. जावा आणि / पायथॉनमधलं ज्ञान
  2. आकिर्टेक्ट, बिल्डिंग, एंड टू एंड काफ्का बेस्ड डेटा पाइपलाइन्समध्ये काम केल्याचा अनुभव हवा. तसंच स्पार्क जॉब्स, एअरफ्लो DAGs, ज्युपिटर नोटबुक्समध्ये अनुभव हवा. (Apple Jobs in India)
  3. डिस्ट्रिब्युटेड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजीमध्ये विशेष प्रावीण्य हवं.
  4. परफॉर्मन्स ट्युनिंग अ‍ॅप्लिकेशन्सची उच्च जाण असावी.
2. DevOps इंजिनीअर्स
कोठे होणार भरती –

DevOps इंजिनीअर्सची पदभरती हैदराबाद ऑफिसला सुरू आहे.

त्या पदासाठी इच्छुक उमेदवारानं प्रॉडक्शनमधल्या तांत्रिक समस्यांवर त्वरित सोल्युशन देणं अपेक्षित आहे. कॉन्फिगरेशनबाबत नोंदी करणं, कठीण विषयांबाबत युझर्सना प्रशिक्षण देणं, स्टेटस रिपोर्ट लिहिणं, अ‍ॅपलचे इतर कर्मचारी व व्यवस्थापनासोबत संवाद ठेवणं या (Apple Jobs in India) जबाबदाऱ्या उमेदवारावर असतील. सिस्टिमची स्टॅबिलिटी, सुरक्षा, उत्पादनक्षमता, स्केलेबिलिटी वाढवण्यासाठी मार्गदर्शन करणं. भविष्यातल्या क्षमतांबाबतच्या गरजा निश्चित करणं, नवीन उत्पादनांविषयी तपासणी करणं हे काम उमेदवाराला करावं लागेल. बॅकअप सिस्टीमची योग्य अंमलबजावणी करणं हेही एक काम असेल. आवश्यक असल्यास 24/7 ऑन कॉल सपोर्ट द्यावा लागेल.

आवश्यक पात्रता
  1. सेल्सफोर्स आर्किटेक्चर, टर्मिनॉलॉजी, कॉम्पोनन्टंस, व्हर्जन प्रोपॅगेशन यावर विशेष प्रावीण्य हवं.
  2. व्हर्जन कंट्रोल टूल्समध्ये प्रावीण्य हवं.
  3. सेल्सफोर्स प्रॉडक्ट सूटमध्ये कम्युनिटी, सेल्स, सर्व्हिस, मार्केटिंग आणि कम्युनिटी क्लाउड्सबाबत माहिती हवी. (Apple Jobs in India)
  4. उमेदवाराला कॉन्फिगरेशन मॅनेजमेंटमध्ये प्रावीण्य हवं.
  5. AWSमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजिंगचा अनुभव हवा.

अ‍ॅपलने भारतात रिटेल स्टोअर्स सुरू करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलायला सुरुवात केली असल्याचा अंदाज बांधला जात आहे. त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com