करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र शासन, महिला व बाल विकास (Anganwadi Bharti 2023) विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) सातारा पूर्व या प्रकल्पांतर्गत रिक्त असलेली मिनी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 52 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ऑगस्ट 2023 आहे.
संस्था – महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन
(एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत बाल विकास प्रकल्प)
भरले जाणारे पद – (Anganwadi Bharti 2023)
1. मिनी अंगणवाडी सेविका – 1 पद
2. अंगणवाडी मदतनीस – 51 पदे
पद संख्या – 52 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 ऑगस्ट 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय (नागरी) सातारा पूर्व, नूतन मराठी शाळेसमोर, मंगळवार पेठ, ता. कराड, जि. सातारा, पिन – 415110
नोकरी करण्याचे ठिकाण – कराड, सातारा
वय मर्यादा –
1. किमान – 18 वर्षे
2. कमाल – 35 वर्षे
3. विधवा उमेदवारांसाठी कमाल – 40 वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
उमेदवार महिला इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
मिळणारे वेतन –
1. मिनी अंगणवाडी सेविका – रुपये 7,200/- दरमहा
2. अंगणवाडी मदतनीस – 5,500/- दरमहा
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज करावा. (अर्जात खाडाखोड / गिरवागिरव करू नये. तसेच व्हाईटनरचा उपयोग करु नये. असे अर्ज रद्द करण्यात येतील.)
3. अर्ज सादर करतेवेळी सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावी. अर्ज सादर केलेनंतर कोणतेही कागदपत्र / प्रमाणपत्र घेतले जाणार नाही. (Anganwadi Bharti 2023)
4. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी. अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या प्रती सक्षम प्राधिकाऱ्याने साक्षांकीत केलेल्या असाव्यात.
5. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
6. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
भरतीचा तपशील –
काही महत्वाच्या लिंक्स – (Anganwadi Bharti 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.satara.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com