करिअरनामा ऑनलाईन । महिला व बाल विकास विभाग, रत्नागिरी (Anganwadi Bharti 2023) अंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदांच्या एकूण 22 जागा भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जुलै 2023 आहे.
संस्था – महिला व बाल विकास विभाग रत्नागिरी
भरले जाणारे पद – अंगणवाडी मदतनीस
पद संख्या – 22 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 जुलै 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – रत्नागिरी
वय मर्यादा – 18 ते 35 वर्षे
अर्ज पाठविण्याचा पत्ता – बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) रत्नागिरी सिंधुदुर्ग, कुलकर्णी कंपाउंड, जेल रोड ता. रत्नागिरी, जि. रत्नागिरी
मिळणारे वेतन – Rs. 5,500/- दरमहा
असा करा अर्ज – (Anganwadi Bharti 2023)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज शेवटच्या तारखेअगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
3. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
4. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 19 जुलै 2023 आहे.
5. अंतिम दिनांकानंतर आलेल्या किंवा पोष्टामुळे विलंब झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे उमेदवाराच्या शैक्षणिक गुण पत्रिकेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे किमान 75 गुण (१२ वी पदवीधर पदव्युत्तर, डी. एड., बी. एड., एम्. एस्. सी. आय. टी. यांचे एकत्रित कमाल ७५ गुण) व अतिरीक्त २५ गुण (विधवा / अनाथ – १० गुण)
2. अनुसुचित जाती / जमाती – १० गुण, इतर मागासप्रवर्ग / विमुक्त जाती/ भटक्या जमाती / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक / विशेष मागास प्रवर्ग -०५ गुण अंगणवाडी सेविका / मदतनीस पदाचा ०२ वर्ष अनुभव असल्यास ०५ गुण
निवड प्रक्रिया –
1. प्रतीक्षा यादी अर्ज स्विकारण्याच्या शेवटच्या दिनांकापासून १५ दिवसात कार्यालयाचे नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात येईल. (Anganwadi Bharti 2023)
2. यादीतील कोणत्याही उमेदवारांच प्रमाणपत्र व त्याबाबतचे दिलेले गुण याबाबत तक्रार असल्यास अर्ज केलेल्या उमेदवारांनी प्राथमिक यादी कार्यालायात / नोटीस बोर्डवर, प्रसिध्द झाल्यापासून पुढील १० दिवसांत बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) रत्नागिरी सिंधुदुर्ग यांच्याकडे लेखी स्वरुपात तक्रार करता येईल. त्यानंतर प्राप्त झालेल्या तक्रारीची कोणत्याही परिस्थितीत दखल घेतली जाणार नाही.
3. जर उमेदवार नियुक्ती आदेशाच्या (Anganwadi Bharti 2023) दिनांकापासून ३० दिवसांपर्यंत रुजू झाला नाही किंवा त्यास अपात्र ठरविण्यात आले, तर प्रतिक्षा यादीतील उमेदवारास गुणानुक्रमानुसार नियुक्ती देण्यात येईल व सदर प्रतिक्षा यादी जाहीर झाल्यापासुन एक वर्षांपर्यंत वैध राहील.
काही महत्वाच्या लिंक्स – (Anganwadi Bharti 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – ratnagiri.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com