करिअरनामा ऑनलाईन । एकात्मिक बाल विकास सेवा योजना केंद्र (Anganwadi Bharti 2023) पुरस्कृत योजने अंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी पालघर (नागरी) जि. पालघर या कार्यालयातील अंगणवाडी मदतनीस यांची रिक्त पदे सरळ नियुक्तीने भरण्याकरिता पालघर जिल्हयातील (मोखाडा, वाडा, विक्रमगड, तलासरी या तालुक्यातील) स्थानिक रहिवाशी असलेल्या महिला उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी इच्छुक महिला उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2023 आहे.
प्रकल्प – एकात्मिक बाल विकास सेवा योजना केंद्र पुरस्कृत योजना
भरले जाणारे पद – अंगणवाडी मदतनीस
पद संख्या – 08 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जुलै 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार महिला 12 वी पास असणे आवश्यक आहे.
नोकरी करण्याचे ठिकाण – पालघर
वय मर्यादा – (Anganwadi Bharti 2023)
1. किमान 18 वर्षे
2. कमाल 35 वर्षे
3. विधवा उमेदवारांसाठी वय मर्यादा कमाल 40 वर्षे राहील.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – C/o जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल विकास दालन क्र.005, नवीन जिल्हा परिषद इमारत, कोळगाव, तळमजला, ता. पालघर, जिल्हा – पालघर
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जासोबत जन्मतारखेचा पुरावा, शैक्षणिक पात्रतेचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र (स्वतःचे नावाचे), अनुभव प्रमाणपत्र, विधवा ( अटी व शर्तीमधील क्र. ६ नुसार दाखला) अनाथ महिला असल्यास (अटी व शर्तीमधील क्र. ७ नुसार दाखला) इ.च्या सक्षम प्राधिका-याकडून साक्षांकित (Anganwadi Bharti 2023) केलेल्या प्रती जोडणे आवश्यक आहे, जोडले नसल्यास अगर साक्षांकित नसल्यास याबाबतचे गुण दिले जाणार नाहीत.
3. उमेदवारांनी अर्ज मुदतीच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
भरतीचा तपशील –
काही महत्वाच्या लिंक्स – (Anganwadi Bharti 2023
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – palghar.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com