Amazon Jobs : यंदाची दिवाळी होणार खास!! Amazon भारतात देणार 1 लाख नोकऱ्या

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । अवघ्या काही दिवसांत दिवाळीचा (Amazon Jobs) जल्लोष सुरु होईल. अशातच अॅमेझॉनने आनंदाची बातमी दिली आहे. दसरा-दिवाळीच्या काळात देशभरातील ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. या पार्श्वभूमीवर Amazon India ने तब्बल 1 लाख रिक्त जागा भरण्याची तयारी केली आहे. Amazon India ने ऑपरेशन नेटवर्कवर एक लाखाहून अधिक हंगामी नोकर्‍या निर्माण केल्या आहेत. अॅमेझॉन इंडियाच्या या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्या संपूर्ण भारतातील तरुणांना मुंबई, दिल्ली, पुणे, बंगळुरू, हैदराबाद, कोलकाता, लखनऊ आणि चेन्नई यांसारख्या शहरांमध्ये दिल्या जातील. 8 ऑक्टोबर 2023 पासून अॅमेझॉन ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’ सेल सुरू होत आहे, त्यामुळे अॅमेझॉन इंडियाने अनेक नवीन कर्मचाऱ्यांना आपल्या नेटवर्कमध्ये सामील करण्याच्या तयारीत आहे. देशभरात आपले नाव मोठे करणे आणि ग्राहकांना चांगला अनुभव देणे, हा मुख्य उद्देश आहे.

अॅमेझॉन ऑपरेशन्सचे उपाध्यक्ष अखिल सक्सेना म्हणाले; अॅमेझॉनसाठी सणासुदीचा हंगाम नेहमीच खास असतो. नीलसन मीडियाने केलेल्या संशोधनातून (Amazon Jobs) असे दिसून आले आहे की, 75% ग्राहकांची ऑनलाइन खरेदीला पहिली पसंती असते. त्यामुळेच ग्राहकांना उत्तम अनुभव देण्यासाठी आम्ही नवीन भरती करत आहोत. Amazon India ने एक मजबूत डिलिव्हरी नेटवर्क तयार केले आहे आणि देशातील 15 राज्यांमध्ये प्रमुख केंद्रे स्थापन केली आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com